शेतकऱ्यांचे शेतीमधील काम आता वेगाने होणार. सरकारकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 3.15 लाख रुपये. वाचा सविस्तर
शेतकऱ्यांना मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर आणि ट्रेलरसारखी साधने खरेदीसाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा नोंदणीकृत गट असणे आवश्यक आहे. तसेच यामधील 80% सदस्य अनुसूचित जातीमधील असणे बंधनकारक आहे.
यासाठी गटाची नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी, बँक खात्याचा तपशील आणि खरेदी करावयाच्या साधनांचा अंदाजे खर्च याची माहिती द्यावी लागणार आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 30 जून 2025 असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे.
यामध्ये खरेदीची मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये असणार आहे. ज्यामध्ये 3 लाख 15 हजार अनुदान मंजूर केले जाणार. तर 35 हजारांचा खर्च संबंधित गटाने करायचा आहे.
शेतकऱ्यांना अर्ज करताना आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखल ठेवणे आवश्यक असणार आहे.
तसेच अर्जदार हा भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे. त्याच्याकडे किमान 2 हेक्टर जमीन असावी.
अर्जदार हा संघटित गटाचा सदस्य असावा. तसेच त्याचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.