PHOTOS

सीए कसं बनायचं? किती मिळतो पगार?

 भारतात चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्यासाठी  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) चा सीए अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. 

Advertisement
1/9
सीए कसं बनायचं? किती मिळतो पगार?
सीए कसं बनायचं? किती मिळतो पगार?

How To Become CA: आर्थिक खाती तयार करणे, आर्थिक सल्ला देणे, लेखापरीक्षण करणे आणि खात्यांचे विश्लेषण करण्याचे काम चार्टट अकाऊंटंट करतो. तो टॅक्स पेमेंटचा हिशेबही पाहतो. थोडक्यात सांगायच तर चार्टर्ड अकाउंटंट हा एक सामान्य आर्थिक व्यावसायिक आहे. 

2/9
लाखोंचे सॅलरी पॅकेज
लाखोंचे सॅलरी पॅकेज

सीए बनल्यास तुम्हाला लाखोंचे सॅलरी पॅकेज मिळते आणि त्यासोबत तुम्हाला करिअरचे अनेक उत्तम पर्याय मिळतात. भारतात चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्यासाठी  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) चा सीए अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. 

3/9
सीए कोण आहे?
सीए कोण आहे?

CA हा एक व्यावसायिक आर्थिक आणि लेखा सल्लागार आहे. सीए हा कंपन्या आणि संस्थांची विविध आर्थिक कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतो.  अकाऊंटींग, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, कर नियोजन आणि कायदेशीर संदर्भांमध्ये तो सल्ला देतो. सीए कंपन्या, चार्टर्ड अकाउंटंट्स फर्म, खाजगी सल्लागार कंपन्यांचे आर्थिक व्यवस्थापन आणि संरचना करण्यात महत्वाचा भाग असतो.

4/9
काय अभ्यास करायचा?
काय अभ्यास करायचा?

सीएचा अभ्यास करण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतरही तुम्ही सीएचा अभ्यास करू शकता. हा कोर्स करण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

5/9
अभ्यासक्रम किती वर्षांचा?
अभ्यासक्रम किती वर्षांचा?

भारतात सीए कोर्सचा कालावधी 4.5 ते 5 वर्षे आहे. त्याचे फाउंडेशन कोर्स, इंटरमीडिएट आणि सीए फायनल असे तीन स्तर आहेत.

6/9
3 महत्वाचे टप्पे
3 महत्वाचे टप्पे

फाउंडेशन कोर्स हा 8 महिन्यांचा असून यामध्ये नवीन विद्यार्थ्यांना सीएचे मूलभूत शिक्षण दिले जाते. इंटरमीडिएट कोर्स  हा 9 महिन्यांचा असून त्यात उच्च स्तरीय वित्त संबंधित शिक्षण दिले जाते. सीए फायनल हा अडीच वर्षांचा अंतिम टप्प्याचा कोर्स आहे. यात तुमच्या कौशल्याचे कसब पाहिले जाते. 

7/9
आर्टिकलशिप
आर्टिकलशिप

सीए अभ्यासक्रमाचा संपूर्ण कालावधी सुमारे 4.5 ते 5 वर्षे आहे. अंतिम परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना 2 वर्षांची अनिवार्य आर्टिकलशिप देखील करावी लागेल. अधिकृत वेबसाइट www.icai.org वर याचा तपशील देण्यात आलाय.

8/9
करिअर पर्याय
करिअर पर्याय

सीए बनून तुम्ही अकाउंटिंग, फायनान्स, टॅक्स आणि फायनान्शियल रेग्युलेशन या क्षेत्रात काम करू शकता. तुमच्याकडे आर्थिक सल्लागार, खासगी कंपन्या, सरकारी संस्थांसोबत काम करण्याचा किंवा तुमचा व्यवसाय स्वतंत्रपणे चालवण्याचा पर्याय असतो.

9/9
पगार
पगार

ICAI च्या 2022 च्या अहवालानुसार,  फ्रेशर सीएचा पगार वर्षाला 8-9 लाख रुपयांपासून सुरू होतो. भारतातील सीएचा सर्वाधिक पगार 60 लाख रुपयांपर्यंत आहे.





Read More