तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की स्मार्टफोनवर इंटरनेट सुरु केल्यानंतर किंवा जास्त वापरल्यानंतर स्मार्टफोन स्लो होतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे नेटवर्क कनेक्शन.
नेटवर्क खराब असेल तर वेब पेज सुरू होण्यास खूप वेळ घेते. व्हिडिओ बफर होतात किंवा डाउनलोड करताना स्पीड कमी होतो. जर तुम्हीदेखील या समस्येहे हैराण आहात तर चिंता करु नका. आम्ही आज तुमच्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत. ज्यामुळं तुमच्या स्मार्टफोनच्या इंटरनेटचा स्पीड वाढेल.
अनेकदा आपण सिम कार्ड त्या दिलेल्या स्लॉटमध्ये नीट टाकत नाही. किंवा अनेकदा सिम कार्ड त्या जागेवर नीट बसलं नसेल त्यामुळंही फोन सिम कार्ड नीट रीड होत नाही आणि इंटरनेट कनेक्शन स्लो होतं.
तुम्हाला इंटरनेटचा स्पीड फास्ट असेल तर सिम कार्ड त्या स्लॉटमध्ये पूर्णपणे फिट बसवणे गरजेचे आहे. सिम कार्ड नीट बसलं आहे का हे एकदा चेक करा.
अनेकदा लोक सिमकार्ड कोणत्याही स्लॉटमध्ये टाकतात. मात्र हे चुकीचं आहे. यामुळंही तुमचं इंटरनेट स्लो चालते.
स्मार्टफोनसाठी चांगला इंटरनेट स्पीड आणि कॉलिंग कॉलिटी हवी असेल तर नेहमी सिम कार्ड सिम स्लॉट एकमध्येच लावा.
सिम स्लॉट 1 लाच प्राथमिक स्लॉट मानले जाते. सिम स्लॉट 1मध्ये सिम टाकल्यास चांगले नेटवर्क सिग्नल मिळतो.
सिम स्लॉट 1 मध्ये सिम लावल्याने इंटरनेट कनेक्शन आधीपेक्षा जास्त फास्ट होईल. काहीच वेळात फायदा मिळण्यास सुरुवात होईल.