PHOTOS

UAN शिवाय आता घरबसल्या तपासा PF Balance; 2 मिनिटांत मोबाईलवर येईल मेसेज

प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातून पीएफ म्हणजेच प्रोव्हिडेंट फंड कापला जातो. पीएफ हा प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पण पीएफ बॅलेन्स कसा तपासायचा याची प्रोसेस आपण जाणून घेऊयात.

Advertisement
1/7
UAN शिवाय आता घरबसल्या तपासा PF Balance; 2 मिनिटांत मोबाईलवर येईल मेसेज
 UAN शिवाय आता घरबसल्या तपासा  PF Balance;  2 मिनिटांत मोबाईलवर येईल मेसेज

पीएफ म्हणजेच प्रोव्हिडेंट फंड हा आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत करतो. पीएफचा एक UAN नंबर असणे गरजेचे आहे. अनेकांना UAN नंबरशिवाय पीएफ बॅलेन्स कसा चेक करावा याची माहिती नसते. याचीच आज माहिती जाणून घेऊयात. 

2/7

तुमचा  UAN आधार, पॅन आणि बँक खात्याशी लिंक आहे आणि KYC पूर्ण आहे. तर तुम्ही घरबसल्या आरामात तुमचा बॅलेन्स किती आहे हे चेक करू शकता. जाणून घेऊयात ही संपूर्ण प्रोसेस

3/7

PF बॅलेन्स तुम्ही मोबाईलवरुनदेखील चेक करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. 

4/7

तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवरून  7738299899 या नंबरवर एक SMS पाठवायचा आहे. EPFOHO UAN HIN हा हिंदी भाषेसाठी कोड आहे. तसंच, तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्येही बॅलेन्स चेक करू शकता. जर तुमची KYC पूर्णपणे अपडेट असेल तर तुम्ही UAN नंबर शिवाय तुमचा बॅलेन्स चेक करू शकता. 

5/7

जर तुम्हा काही कारणास्तव SMS च्या माध्यमातून बॅलेन्स चेक करू शकत नाही तर तुम्ही एका Missed Callनेदेखील माहिती मिळवू शकता. Missed Callने माहिती मिळवण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरहून 9966044425 वर मिसकॉल द्यावा लागेल. त्यानंतर कॉल स्वताःहून कट होईल. त्यानंतर थोड्यावेळाने तुमच्या फोनवर एसएमएस येईल. त्यावर तुमच्या पीएफ अकाउंटसंबंधीत सर्व माहिती येईल. 

6/7

जर तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे तुमचा पीएफ बॅलन्स तपासत असाल, तर तुमचा यूएएन नंबर आधार किंवा पॅनशी लिंक केलेला असणे आणि तो सक्रिय असणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचा UAN नंबर माहित नसेल, तर तुम्ही तो तुमच्या पगार स्लिपमधून देखील मिळवू शकता. जर तुमच्याकडे UAN असेल, तर तुम्ही EPFO ​​अॅप किंवा वेबसाइटवरून PF पासबुक डाउनलोड करू शकता आणि तुमच्या ठेवींची संपूर्ण माहिती पाहू शकता.

7/7

याशिवाय, तुम्ही उमंग अ‍ॅपद्वारे तुमचा पीएफ बॅलन्स सहजपणे तपासू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम प्ले स्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर EPFO ​​सेवा निवडा आणि कर्मचारी केंद्र सेवांमध्ये जा आणि येथे View Passbook वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा UAN नंबर टाकल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल, तो टाका. सर्व काही भरल्यानंतर, तुम्ही डाउनलोड पर्यायावर क्लिक करून पीएफ पासबुक पाहू किंवा सेव्ह करू शकता.





Read More