PHOTOS

मिक्सरचे भांडे काळेकुळकुळीत पडलंय? घरातील 'या' पदार्थांचा वापर करुन काढा हट्टी डाग

मिक्सरवर पडलेले किचकट, तेलकट डाग हटवण्यासाठी आता तुमच्या किचनमधील पदार्थांचाच वापर करु शकता. ही सिंपल ट्रिक वापरुन तुम्ही सहज हट्टी डाग काढू शकता. 

Advertisement
1/5
मिक्सरचे भांडे काळेकुळकुळीत पडलंय? घरातील 'या' पदार्थांचा वापर करुन काढा हट्टी डाग
मिक्सरचे भांडे काळेकुळकुळीत पडलंय? घरातील 'या' पदार्थांचा वापर करुन काढा हट्टी डाग

एकदिवस जरी मिक्सर किंवा मिक्सरचे भांडे खराब झाले तर गृहिणींच्या जीवाला जैन पडत नाही. चटणी, वाटण किंवा दाण्याचा कूट बनवण्यासाठी मिक्सर लागतोच. अनेकदा सतत मसाल्यांचे वाटण वाटूण किंवा चटणी वाटल्यानंतर मिक्सरवर मसाल्यांचे डाग पडतात. मिक्सरच्या भांड्याच्या आतील बाजूल असलेल्या व्हिलही जाम होतात. अशावेळी मिक्सर खूप स्लो चालतो. मिक्सर वेगाने चालवण्यासाठी आणि डाग काढून टाकण्यासाठी घरातीलच पदार्थांचा वापर करुन  तुम्ही मिक्सच चकाचक स्वच्छ करु शकणार आहात. 

2/5
बेकिंग पावडर
बेकिंग पावडर

बेकिंग पावडरचा वापर करुन मिक्सरवर व त्यांच्या भांड्यावर पडलेले मसाल्यांचे डाग स्वच्छ करु शकते.एका भांड्यात बेकिंग पावडर आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मिक्सरच्या भांड्यावर बाहेरुन लावा. काही मिनिटांसाठी भांडे तसेच ठेवून मग पाण्याने स्वच्छ धुवा. 

3/5
सॅनिटायझर
सॅनिटायझर

सॅनिटायझर मिक्सर ग्राइंटर स्वच्छ करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. मिक्सर जारमध्ये थोडं सॅनिटायझर टाकून थोड्यावेळासाठी ठेवून द्या. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून मिक्सरचे बटन ऑन ऑफ करा आणि ते पाणी फेकून द्या. मग साध्या पाण्याने मिक्सरचे भांडे स्वच्छ करा.

4/5
व्हिनेगर
व्हिनेगर

मिक्सरचा जार स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाण्यात 2 चमचे व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण जारमध्ये काही सेकंदासाठी मिसळा. त्यामुळं हट्टी डाग दूर होतील. तर, मसाल्यांचे वासदेखील येणार नाहीत. 

5/5
लिंबाची साल
लिंबाची साल

काही गृहणी लिंबाची साले फेकून देतात. मात्र लिंबाच्या सालांमुळं तुम्ही घरातील अनेक वस्तू चकाचम स्वच्छ करु शकतात. मिक्सरचे जार स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर लिंबाचे साल आणि मीठ घेऊन आतल्या व बाहेरच्या बाजूने लिंबाचे साल लावून घासा. काही वेळ तसेच ठेवून द्या व नंतर स्वच्छ पाण्याने धुवा 





Read More