नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
Tips For Out Of Depression: आजच्या काळात नैराश्य ही एक सामान्य समस्या बनली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांमध्ये ही समस्या वाढत आहे. सध्याच्या काळात निरोगी आयुष्यासाठी मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. भारतात 56 दशलक्ष लोक नैराश्याने ग्रस्त आहेत आणि 38 दशलक्ष लोक चिंता विकाराने ग्रस्त असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे.
नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
जेव्हा कधी आयुष्यात नैराश्य आलंय असे वाटेल तेव्हा हातातील काम बाजूला ठेवा आणि संगीता राज्यात जा. गाणी ऐकण्यासोबत मोठमोठ्याने गाणी गा. चांगली आणि आनंदी गाणी ऐकल्याने आनंदी हार्मोन्स वाढतात आणि तुमचा मूड चांगला राहतो. यामुळे तुमचे नैराश्य दूर होते आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल.
खूप उदास वाटत असेल तर सरळ उभे राहून बॉल हातात घ्या, जमिनीवर आपटा. असे केल्याने मनाला शांती मिळते आणि रागही शांत होतो. हा व्यायाम दिवसातून अनेक वेळा करा. तुमचे लक्ष या गोष्टीकडे केंद्रीत होऊन नैराश्यातून तुम्हाला थोडा आराम मिळालेला जाणवेल.
शरीराची हालचाल करणे हा एक प्रकारचा व्यायाम आहे. यामुळे मन आणि मेंदू शांत होतो. यासाठी नेमकं काय करायचं? ते समजून घ्या. सरळ उभे राहून हात-पाय हलवा. शरीराची हालचाल वाढवा. असे केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. नैराश्य आणि चिंतापासूनही आराम मिळतो.
नैराश्यात असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारा. यामुळे नैराश्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. मिठी मारल्याने तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही. तसेच आधारही मिळतो. तुमच्याकडे मिठी मारण्यासाठी कोणी नसल्यास तुम्ही टेडी बेअर किंवा खेळण्यालाही मिठी मारू शकता.
आपले तोंड बर्फाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्याने डायव्हिंग रिफ्लेक्स सुरू होते. ज्यामुळे तुम्हाला हळुहळू बरे वाटते. असे केल्याने स्नायू सक्रिय होतात आणि मनही शांत होते. ज्यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते.