Ghibli-style photos : तुम्हालाही पाहायचीये का तंत्रज्ञानाची कमाल? मग हे टूल वापरूनच पाहा.
...
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जिब्ली फोटोंनी तुमचीही मनं जिंकलीयेत? हा फोटो ओळखता येतोय? 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधील हा आयकॉनीक सीन.
'भूलभुलैय्या'मधील छोटे पंडितचा हा अवतार पाहून नकळत हसू आलं असेल. तर, असे फोटो तयार करण्यासाठी सर्वप्रथम ब्राऊजरमध्ये ChatGPT (chat.openai.com) सुरू करा. इथं तुम्ही GPT-4o वापरत आहात याकडे लक्ष द्या.
आता इथं तुम्ही फोटो अपलोड करून GPT-4o ला कमांड देऊ त्याचं जिब्ली वर्जन मिळवू शकता. अगदी 'बाहुबली' सारखं. किंवा फोटोचं शाब्दिक वर्णन देऊनही जिब्ली फोटो मिळवता येऊ शकतो.
ओपन एआयनं तुम्हाला फोटो तयार करून दिल्यानंतर तुम्ही त्यात आणखी वेरिएशनही देऊ शकता. ज्यामध्ये रंगसंगती आणि इतर बदालंचा समावेश आहे. 'हेरा फेरी'मधील हा सीन आठवतोय ना?
तुम्हाला अपेक्षित असणारा फोटो किंवा अंतिम प्रोडक्ट समोर आल्यानंतर ते डाऊनलोड करून तुम्ही शेअर करु शकता. 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील हे दृश्यही जिब्ली फॉर्ममध्ये कसं वाटतंय?
डेस्कटॉपवर तुम्ही जिब्ली फोटो तयार करत असाल तर, फोटोवर राईट क्लिक करून तुम्ही तो डाऊनलोड करू शकता. 'गोलमाल' चित्रपटातील सीनचा जिब्ली फोटो हे या टूलचं कमाल उदाहरण.
'शोले'मधील हा फोटो पाहा. हे असे फोटो तुम्हाला मोबाईलवर तयार करून डाऊनलोड करायचे असल्यास त्या फोटोवर थोड्या काळासाठी क्लिक करून ठेवा आणि तो डाऊनलोड करा.
'अंदाज अपना अपना' प्रमाणं... खरंच अनोख्या अंदाजातील हे फोटो तुम्ही वॉलपेपरला ठेवण्यापासून ते सोशल मीडियावर शेअर करेपर्यंतसुद्धा वापरू शकता. काय मग? कधी करताय जिब्ली स्टाईल फोटो? (सर्व छायाचित्र - @ivivekch/ X)