How To Find Hidden Camera in Hotel Room: आजकाल आपण कुठे फिरायला जायचं म्हटलं की सगळ्यात आधी हॉटेल शोधतो. ते हॉटेल कसं आहे तिथे सेफटी आहे की नाही या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत असतो. अशात तुम्हाला कधी कधी कामाच्या निमित्तानं इच्छा नसताना देखील जे मिळे त्या हॉटेलमध्ये रहावं लागतं. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये थांबता तिथे काही डिवाइसेज आहेत का हे आधी तपासून पाहा. कारण तेच डिव्हाईस आपले फोटो किंवा आपला व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची शक्यता असते.
अनेक ठिकाणी टिव्ही सेटच्या वर किंवा टिव्हीत कॅमेरा लपवण्यात येतो. जो तुम्हाला रेकॉर्ड करत असतो. ते तपासण्यासाठी तुम्ही टिव्ही ऑफ करा आणि टिव्ही ऑफ केल्यानंतरही जर त्याचं पावर लाइट सुरु असेल तर त्यात काही गडबड आहे.
अनेकदा लॅम्पमध्ये कॅमेरे लपवण्यात येतात. जे तुम्हाला स्पष्टपणे रेकॉर्ड करत असतात. अनेकदा तर काही माईकही असतात जे तुमचा आवाज देखील रेकॉर्ड करतात.
अनेक पावर आउटलेटमध्ये देखील कॅमेरे लपवण्यात आलेले असतात. त्यामुळे अशात तुम्ही जेव्हाही हॉटेल रुममध्ये एन्ट्री करतात, तेव्हा पावर आउटलेट व्यवस्थित तपासून घ्या.
हॉटेल रुममध्ये स्मोक डिटेक्टर आहे का ते तपासा. जर स्मोक डिटेक्टर आहे जे तुमच्या रुफवर लावण्यात आलं आहे. तर त्यातही कॅमेरा लपवण्यात देखील त्याचा वापर करण्यात आल्याची शक्यता असते.
अनेकदा कॅमेरा लपवण्यासाठी असलेली सगळ्यात सेफ जागा म्हणजे घड्याळ आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या रुममध्ये असलेलं घडळ्या संपूर्णपणे तपासा.
अनेक हॉटेल्समध्ये अॅन्टिक गोष्टी असतात. त्यातही अनेक रेडियो क्लॉक असतात तरही हिडेन कॅमेरा असू शकतो.
(All Photo Credit : Social Media)