PHOTOS

दिवाळीत चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी बनवा टोनर

Homemade toner :दिवाळीत सुंदर नितळ त्वचा सगळ्यांनाच हवी असते. पण त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ते कळत नाही. तुम्हाला त्वचेसाठी फार काही करण्यासाठी वेळ नसेल तर तुमच्यासाठी टोनर हे अमृताप्रमाणे आहे. 

 

Advertisement
1/8
दिवाळीत चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी बनवा टोनर
दिवाळीत चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी बनवा टोनर
2/8

तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या काही घटकांसह, तुम्ही घरच्या घरी सहजपणे एक उत्तम टोनर बनवू शकता, जे तुमची त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करेल. 

3/8
एलोवेरा जेल आणि गुलाबजल
एलोवेरा जेल आणि गुलाबजल

टोनरच्या वापरामुळे तुमच्या त्वचेत अडकलेले धुळीचे कण, माती निघून त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. एलोवेरा जेल आणि गुलाबजल मिक्स करून तुम्ही टोनर बनवू शकता. त्यामुळे त्वचा मॉइश्चराईज होईल.

4/8
काकडी रस
काकडी रस

टोनरमुळे चेहऱ्यावरचे ओपन पोर्स कमी होतात. यासाठी काकडी किसून घ्या आणि नंतर किसलेल्या काकडीचा रस काढा. त्यात एलोवेरा जेल टाकून टोनर बनवता येऊ शकते.

5/8
नारळ पाणी आणि दूध
नारळ पाणी आणि दूध

टोनरच्या वापरामुळे त्वचा मुलायम होते. नारळ पाणी आणि दूध घ्या आणि दोन्ही घटक चांगले मिसळा. हे टोनरमधील घटक तुमची त्वचा हायड्रेट करते.

6/8
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पाने

कोरडया त्वचेसाठी तुम्ही टोनर अगदी हमखास वापरायला हवे. कडुलिंबाच्या पानांना पाण्यात उकळवून त्यात अॅप्पल सायडर विनेगर टाकून टोनर बनवा. या टोनरच्या वापरामुळे तुमचे पिंपल्स कमी होऊ शकतात.

 

7/8
ग्रीन टी
ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स तत्वं असतात. ज्यामुळं त्वचा मॉईश्चराईज करणारे घटक आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते. पाण्यात 2-3 ग्रीन टीच्या बॅग टाकून पाणी थंड होऊ द्या आणि हे टोनर रोज चेहऱ्यावर लावा.

8/8

Disclaimer: (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही.)

 





Read More