Remove Excessive Oil: जेवण बनवताना अनेकदा अनावधानानं त्यात तेलाचं प्रमाण जास्त होतं आणि त्या कारणामुळं अगदी जेवणाची चवसुद्धा बदलते. अशा वेळी नेमकं काय करावं?
Remove Excessive Oil: जेवणात तेलाचं प्रमाण बेताचं असणं आरोग्यास फायद्याचं ठरतं. पण, हेच प्रमाणच जरासुद्धा वाढलं तर मात्र त्याचे थेट परिणाम आरोग्यावर दिसू लागतात. हृदयरोगांपासून ते अगदी हाय कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर व्याधी त्रास देऊ लागतात.
जेवणात जास्तीचं पडणारं हे तेल, जेवण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तवंग होऊन वर येतं तेव्हा अंदाज येतो, की काहीतरी चुकलं आहे आणि मग प्रयत्न सुरू होतात हे तेल कमी करण्याचं किंवा काढण्याचं.
टिश्यूपेपर- किचन टिश्यूपेपरच्या वापरानं जेवणासाठी वापरलं जाणारं तेल पदार्थातून कमी करता येतं. यासाठी टिश्यू अगदी अलगट पदार्थावरल ठेवावा किंवा त्याचं एक टोक पदार्थात बुडवावं जेणेकरुन तो तेल शोषून घेईल.
दही किंवा बेसन - शाकाराही किंवा मांसाहारी जेवणातून तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी दही किंवा बेसनाचा वापर करता येऊ शतो. बेसन टाकल्यानं रसभाज्या दाट होतात आणि दह्यामुळंसुद्धा एक चांगली चव प्राप्त होते.
भाज्या- एखाद्या शाकाहारी पदार्थामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये तेल जास्त झाल्यास बटाटा, पनीर अशा गोष्टी मिसळून भाजीची चवही वाढवता येते आणि या गोष्टी जास्तीचं तेलही शोषून घेतात.
ब्रेड किंवा चपाती- ब्रेड आणि चपाती तेलाचा तवंग कमी करण्यात मदत करतो. तेलावर एक ब्रेड ठेवल्यास तो झरझर तेल शोषून घेतो.
बर्फ- बर्फाच्या तुकड्याच्या मदतीनंही पदार्थांमधील जास्तीचं तेल काढता येतं. जिथं तेलामध्ये तुकडा बुडवल्यास तेल बर्फावर चिकटून त्याचा थर हळुहळू काढता येतो.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)