How To Stop Nail Biting Habit : चारचौघात, मीटिंग चालू असताना. महत्वाच्या गोष्टी करताना नखं चावणं हे अतिशय घाणेरडा वाटतं. लोक आपल्याला नावं ठेवतात, कितीही केलं तरी ही सवय सुटता सुटत नाही.
जर तुम्हाला नखं चावण्याची घाणेरडी सवय असेल तर ,नखांची वाढ कमी करा. नखांना नियमितपणे ट्रिम करा. नखं लहान असतील तर ती तुम्हाला चावता येत नाहीये.
नखं चावणं हे बऱ्याचदा एन्गझायटीमुळे होतं. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
जेव्हा जेव्हा तुम्हाला नखं चावण्याची इच्छा होईल तेव्हा चॉकलेट किंवा मिंट चघळा.
नेल एक्सटेंशन करून घ्या . त्यामुळे सुंदर नखं चावून खराब करण्याचा मोह कमी होईल.
नखांना नेलपेंट लावा. नेलपेंट तोंडात गेल्याने तुम्ही नखं चावताना विचार कराल.