IND vs PAK Reserve Day : पावसाने सामन्यात एन्ट्री घेतल्याने आता भारत-पाक सामना राखीव दिवशी हलवण्यात आलाय. रिझर्व्ह डेला हवामान (weather update) कसं राहिल? पाहुया...
भारत पाकिस्तान सामन्याच्या राखीव दिवसावर देखील पावसाचं सावट कायम आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होईल अशी शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.
Accuweather च्या अंदाजानुसार, राखीव दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर रोजी पाऊस होण्याची शक्यता 99 टक्के आहे.
राखीव दिवशी कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियस, तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस असणार आहे.
सामन्याच्या दिवशी वाऱ्याचा वेग 41 किमी प्रतितास इतका असेल. त्यामुळे मुसळधार पावसाचा प्रत्यय येऊ शकतो
दिवसभर आभाळ दाटलेलं राहणार असल्याने राखीव दिवशी देखील सामना होण्याची शक्यता शुन्य दिसतीये.
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.