PHOTOS

'मला नग्न व्हायचंच होतं', जेव्हा ऋषी कपूर यांनी शूट केला सीन, अरुणा इराणींनी घेतला होता आक्षेप

Aruna Irani on Rishi Kapoor Scene : बॉबीमधील एका सीन करण्यासाठी अरुणा इराणी यांनी स्पष्ट नकार दिला होता. राज कपूर यांनी अरुणा यांचं मन परिर्वतन केल्यानंतर त्या सीन करण्यासाठी तयार झाल्यात. 

 

 

Advertisement
1/9

बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक चित्रपट आहेत. रोमान्सची परिभाषा गेल्या काही वर्षांमध्ये जरी बदलली असली, तरी एकेकाळी अभिनेत्री रोमान्स करतानाचे अनेक सीन करण्यास नकार द्यायचे. 1973 मधील गाजलेला आणि सर्वात रोमँटिक चित्रपट बॉबी यातून ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया एका रात्रीत सुपरस्टार झाले होते. राज कपूर यांच्या या चित्रपटात अरुणा इराणी यांनी एका बोल्ड सीन करण्यास नकार दिला होता. 

 

2/9

खरंतर, चित्रपटात ऋषी कपूर आणि अरुणा इराणी यांच्यात एक सीन होता, जो करण्यासाठी अरुणा यांनी नकार दिला होता. तो सीन असा होता की, अभिनेता टॉवेल घालून बाथरूममधून बाहेर येईल आणि अरुणा यांच्या समोर तो टॉवेल पडेल. ज्यामुळे अभिनेता पूर्णपणे नग्न अवस्थेत दिसेल. हा सीन ऐकल्यानंतर अरुणा इराणी यांनी नकार दिला. 

 

3/9

राज कपूर यांना हा सीन चित्रपटात हवा होता. त्यामुळे त्यांनी अरुणा यांची समजूत काढण्याच ठरवलं. या सीनमध्ये एक बदल करण्यात आला. जेव्हा अभिनेता यांचा टॉवेल पडेल तेव्हा अरुणा थेट ऋषी कपूरकडे पाहणार नाही. त्या अटीवर अरुणा सीन करण्यासाठी तयार झाल्यात आणि अखेर हा सीन शूट झाला. 

 

4/9

गंमत म्हणजे या सीननंतर एकदा ऋषी कपूर अरुणा इराणी यांना भेटले. तेव्हा त्यांनी विचारलं, 'मला नग्न व्हायचं होतं, मग तू तो सीन करायला का नकार दिलास?' यावर अभिनेत्री म्हणाली की तिला खूप लाज वाटत होती. पण चित्रपटातील हा सीन त्या काळात खूप गाजला होता. 

 

 

5/9

बॉबी हा चित्रपट लव्ह स्टोरी होती, ज्यात राजनाथ (ऋषी कपूर) आणि बॉबी (डिंपल कपाडिया) प्रेमात पडतात. हा चित्रपट त्या काळात खूप प्रसिद्ध गाजला होता. या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत. 

6/9

तर आम्ही तुम्हाला सांगतो की, एकेकाळी अरुणा आणि मेहमूद हे दोघे लग्न करणार अशी अफवा पण पसरली होती. अरुणा आणि मेहमूदची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री इतकी उत्तम होती त्यामुळे ही अफवा पसरली होती असं म्हणतात. तर मेहमूद आधीच विवाहित होता. अरुणाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की ते फक्त जवळचे मित्र होते. 

7/9

महमूदची पत्नी ट्रेसी अली यांनी अफवांवर राग व्यक्त केला आणि महमूदला अरुणासोबत काम करण्यास मनाई केली. यानंतर दोघांनीही एकत्र काम करणे बंद केलं. 

 

8/9

1972 मधील 'बॉम्बे टू गोवा' च्या रिलीजनंतर, अरुणा आणि मेहमूदचे लग्न झाल्याच्या अफवा पसरल्या. जेव्हा लोकांनी मेहमूदला हा प्रश्न विचारला तेव्हा तो हो किंवा नाही असे काही म्हणाला नाही, ज्यामुळे अफवांना आणखी बळ मिळाला होता. या घटनेनंतर अरुणा यांना चित्रपटसृष्टीत अडीच वर्षे काम मिळाले नव्हते. 

9/9

अरुणा नंतर म्हणाल्यात की, तिने या अफवांना तिच्याकडून दूर करण्याचा प्रयत्न केला नाही, जी तिची चूक होती. ती म्हणाली, “महमूदने माझे करिअर बनवले, पण त्याच्यामुळे माझे करिअरही उद्ध्वस्त झाले. 





Read More