शाहिद कपूर आणि कियारा अडवणीचं नाव घेतल्यास डोळ्यासमोर येतो कबीर सिंग चित्रपट. यामधील दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते घायाळ झाले होते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शाहिदच्या कानशिलात द्यावी, असं कियाराच्या मनात आलं होतं.
कबीर सिंग हा चित्रपट तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक होता. तरीदेखील तो भारतीयांना खूप आवडला. शाहिद आणि कियारा यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भेडली.
या चित्रपटात कियारा शांत स्वभावाची दाखविण्यात आली होती. तर शाहिद हा आक्रमक वृत्तीचा होता.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, कबीर सिंगच्या सेटवर कियाराच्या मनात शाहिदच्या कानाखाली द्यावे, असं वाटलं होतं.
कबीर सिंगच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं याबद्दल कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये कियाराने सांगितलं होतं.
अभिनेत्री म्हणाली की, झालं असं की एका दिवशी शूटिंगच्या वेळी शाहिदने सीनमध्ये कोणते बूट घालावे यासाठी तब्बल 8 तास घेण्यात आले.
कियारा म्हणाली की, एवढा वेळ फक्त बुटांवर घालवल्यामुळे मला त्यावेळी मनात आलं की, शाहिदच्या कानाखाली मारावी. हे ऐकून करणही हसला.
पण दुसरीकडे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बोलायचं झालं तर 68 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने 370 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणार तो तिसरा चित्रपट ठरला होता.