बालपणातच त्यांनी वडिलांचं छत्र गमावलं. यानंतर आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं. पण रडायच नाही लढायच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.
IAS Divya Tanwar Success Story: आयुष्याच्या सुरुवातील जितका संघर्ष आला तरी खचून न जाता जे लढत राहतात, त्यांच्या वाट्याला यश हे येतंच. यांच्याच कहाण्या पुढे जाऊन लाखो तरुणांसाठी प्रेरणा बनतात.
आयएएस अधिकारी दिव्या तन्वर यांचीही अशीच कहाणी आहे.बालपणातच त्यांनी वडिलांचं छत्र गमावलं. यानंतर आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं. पण रडायच नाही लढायच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.
दिव्या शाळेत असताना एका कार्यक्रमाला एसडीएम प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. शाळेकडूनं त्यांचा आदर सन्मान केला जात होता. एसडीएस यांचा रुबाब, बोलणे यामुळे दिव्या चांगल्याच प्रभावित झाल्या.
यानंतर मोठं काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. आपल्या आईला अभिमान वाटावा, असे करण्याचे दिव्या यांनी तेव्हाच ठरवून टाकले आणि आयएएस बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याला यूपीएससीची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम पाहिला. सर्व काही समजून घेतल्यानंतर परीक्षेची तयारी सुरू केल्याचे तो सांगतो.
माझ्या मनावर खूप दडपण होते पण मी माझी तयारी सुरुच ठेवली.. नकारात्मक विचार मनात येऊ दिले नाहीत. माझ्या तयारीत आई तसेच माझ्या भावंडांनी मला खूप मदत केल्याचे दिव्या सांगते.
दिव्या यांनी यूपीएससची तयारी करताना इंटरनेटची मदत घेतली. युट्यूबवर त्यांनी टॉपर्सच्या मुलाखती पाहिल्या. परीक्षेच्या तयारीसाठी NCERT पुस्तकांची मदत घेतली. मेहनत कधीच व्यर्थ जात नाही, आज नाही तर उद्या तुम्हाला त्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळते, यावर त्यांचा विश्वास होता.
2021 मध्ये दिव्या तन्वर पहिल्यांदा यूपीएससी परीक्षेला बसल्या. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. एवढेच नव्हे तर त्यांना पहिल्याच प्रयत्नात 438 वी रँक मिळाली. जेव्हा त्यांनी ही परीक्षा दिली तेव्हा त्या फक्त 21 वर्षांच्या होत्या.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या आयपीएस अधिकारी झाल्या. पण त्यांचे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नव्हते. त्यांना आयपीएस बनायचे होते. यासाठी त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली. येथे त्या 105 वा क्रमांक मिळाला. कोणत्याही कोचिंगची मदत न घेता स्वत:च्या बळावर त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली.