IAS Success Story: प्रत्येक तरुणाचं आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा असते. आपण डॉक्टर, इंजिनिअर होऊन आई-वडिलांची छाती अभिमानाने फुलवावी असं प्रत्येकाला वाटत असत. पण काहींना आयुष्यात फार मोठी उंची गाठण्याची इच्छा असते. आयएएस अधिकारी मुद्रा गैरोला यांचा प्रवास असाच आहे.
IAS Success Story: प्रत्येक तरुणाचं आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा असते. आपण डॉक्टर, इंजिनिअर होऊन आई-वडिलांची छाती अभिमानाने फुलवावी असं प्रत्येकाला वाटत असत. पण काहींना आयुष्यात फार मोठी उंची गाठण्याची इच्छा असते. आयएएस अधिकारी मुद्रा गैरोला यांचा प्रवास असाच आहे.
मुद्रा गैरोला यांना लहानपणापासूनच अभ्यासात खूप रस होता. त्या उत्तम कामगिरी करत टॉपर राहिल्या होत्या.
मुद्रा यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत 96 टक्के आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत 97 टक्के गुण मिळवले होते. शालेय शिक्षणादरम्यान त्यांना भारतातील पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांनी सन्मानित केलं होतं.
आयएएस अधिकारी मुद्रा गैरोला उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील आहेत. सध्या त्यांचं कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुद्रा यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयात बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
कॉलेजातही त्या टॉपर होत्या. त्यांना बीडीएसमध्ये सुवर्णपदक मिळाले. पदवीनंतर त्या दिल्लीला आल्य़ा आणि एमडीएसमध्ये प्रवेश घेतला. परंतु त्यांच्या वडिलांना नेहमीच त्यांनी आयएएस अधिकारी व्हावे असं वाटत होतं.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुद्रा यांनी एमडीएसचे शिक्षण अर्ध्यावरच सोडलं आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
2018 मध्ये, मुद्रा पहिल्याच प्रयत्नात मुलाखत फेरीत पोहोचल्या होत्या. 2019 मध्ये, त्या पुन्हा यूपीएससीच्या मुलाखतीच्या फेरीत पोहोचली, परंतु निवड झाली नाही. त्यानंतर, 2020 मध्ये, त्या मुख्य परीक्षादेखील उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत.
2021 मध्ये आयएएस मुद्रा पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षेला बसल्या. यावेळी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि आयपीएस झाल्या.
मुद्रा यांनी पुन्हा आयएएस होण्याचा प्रयत्न केला. 2022 मध्ये, त्या 53 व्या रँकिंगसह यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस होण्यात यशस्वी झाले आणि अशाप्रकारे, 50 वर्षांपूर्वी पाहिलेले वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले.