IAS Success Story: यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते.देशातील लाखो तरुण याची वर्षानुवर्षे तयारी करतात. यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. अनेक अपयशांना तोंड द्यावे लागते. पण काही लोक त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि हुशार रणनीतीने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होतात.
आयएएस अधिकारी सृष्टी दाबास या यापैकींच एक आहेत. त्यांनी 2023 च्या नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) 6 मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले.
सृष्टी दबासचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांनी दिल्लीतील गंगा इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सृष्टी या सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी 2016-17 च्या सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेत 96.33% गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए केले. नंतर इग्नूमधून एमए देखील केले.
सृष्टी दबास यांचा प्रवास सोपा नव्हता. यूपीएससीची तयारी करत असताना त्यांनी मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये ग्रेड II एचआर कर्मचारी म्हणून काम केले. दिवसभर काम केल्यानंतर त्या रात्री परीक्षेची तयारी करत.
यापूर्वी सृष्टी यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातही काम केले होते. यूपीएससी परीक्षेत सृष्टी यांनी लेखी परीक्षेत 862 गुण आणि मुलाखतीत 186 गुण मिळवले. म्हणजेच त्यांना एकूण 1048 गुण मिळाले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी हे यश मिळवले.
नोकरीसोबतच यूपीएससीची तयारी करणे खूप कठीण होते. पण आरबीआयची लायब्ररी आणि जेवणाच्या सुट्ट्यांचा चांगला वापर करून मी अभ्यासासाठी वेळ काढल्याचे सृष्टी दबास यांनी एका मुलाखतीत सांगितले. योग्य रणनीती, सतत कठोर परिश्रम आणि वेळेचे व्यवस्थापन करून ही परीक्षा उत्तीर्ण होता येते, असेही त्या पुढे म्हणाल्या.
यूपीएससीच्या उमेदवारांना केवळ कोचिंग नोट्सवर अवलंबून राहू नका तर वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करा. परीक्षेच्या काही महिने आधी दररोज 4 वर्तमानपत्रे वाचा असा सल्ला त्या उमेदवारांना देतात.
अभ्यासाव्यतिरिक्त सृष्टी दबास या एक प्रतिभावान कथक नृत्यांगना देखील आहेत. साधेपणा आणि बुद्धिमत्तेमुळे त्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
सृष्टी या खरोखरच 'ब्युटी विथ ब्रेन'चे एक उदाहरण आहे. सृष्टी दाबासचे यांनी पहिल्या प्रयत्नात मिळवलेले हे यश त्या सर्व यूपीएससी इच्छुकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने त्यांची स्वप्ने सत्यात उतरवायची आहेत.