PHOTOS

सैफ अली खानच्या लेकासोबत पुन्हा दिसली 'ती'; बहीण सारासुद्धा तिथंच, आणि....

खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत आहेत, अशा अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. अशातच दोघे चित्रपट पाहायला जात असल्याचे पापाराझींनी प...

Advertisement
1/8

Ibrahim Ali Khan And Palak Tiwari: इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्यातील नात्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगल्या आहेत. दोघांनीही अद्याप त्यांच्या रिलेशनशिपबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी, त्यांना वेळोवेळी एकत्र पाहिलं जातं आहे. अलीकडेच या जोडीला पुन्हा एकदा मुव्ही डेटवर एकत्र पाहण्यात आलं आणि त्यांच्या सोबत सारा अली खानही होती, ज्यामुळे चर्चांना उदाण आले आहे.

2/8
चित्रपटगृहाबाहेर पापाराझींनी केले स्पॉट
चित्रपटगृहाबाहेर पापाराझींनी केले स्पॉट

या तिघांना एका सिनेमा थिएटरच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या उत्साहात काढले. सोशल मीडियावर हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. पलक आणि इब्राहिम दोघंही कॅमेऱ्यांपासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होते. पण तरीही त्यांच्या हालचाली चाहत्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत.

3/8
इब्राहिम अली खानचे बॉलिवूड पदार्पण
इब्राहिम अली खानचे बॉलिवूड पदार्पण

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान नुकताच करण जोहरच्या 'नादानिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तो याआधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये कार्यरत होता. त्याच्या अभिनय कारकीर्दीपेक्षा त्याचे खासगी आयुष्य सध्या अधिक चर्चेत आहे.

4/8
पलक तिवारीचा बॉलिवूड प्रवास
पलक तिवारीचा बॉलिवूड प्रवास

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने 'बिजली-बिजली' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर तिने सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात पदार्पण केले. सध्या ती विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून, तिची फॅशन सेंस आणि व्यक्तिमत्त्वामुळे ती कायम चर्चेत असते.

5/8
सारा अली खानने दिली खास उपस्थिती
सारा अली खानने दिली खास उपस्थिती

सारा अली खानने या मुव्ही डेटसाठी आपल्या भावासोबत उपस्थिती लावली. ज्यामुळे ही भेट अधिक खास वाटली. सारा आणि इब्राहिम यांच्यातील बंध लक्षवेधी आहे आणि दोघं अनेकदा एकत्र फिरताना, सुट्ट्यांमध्ये फोटो शेअर करताना दिसतात. त्यांच्या भाऊ-बहिणीच्या बाँडिंगवर चाहत्यांचं विशेष प्रेम आहे.

6/8
चर्चा सोशल मीडियावर रंगल्या
चर्चा सोशल मीडियावर रंगल्या

इब्राहिम, पलक आणि सारा यांचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहते आणि फॅन पेजेसवर चर्चांना सुरुवात झाली आहे. अनेकांनी इब्राहिम आणि पलकच्या नात्यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारले. तर काहींनी सारा अली खानच्या सिम्पल आणि ग्रेसफुल लूकचं कौतुक केलं.

7/8

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्यातील मैत्री किंवा नात्याविषयीची चर्चा सध्या जोरात असून, त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक उपस्थितीला चाहते आणि मीडियाचं लक्ष मिळतं आहे.

8/8




Read More