ग्लोबल वार्मिंगमुळे हिमनद्या वितळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही.
म्हणूनच कृत्रिम आईस स्तूप थंडीत पाणी साठवून ठेवतात. आणि गरमीत हळूहळू वितळत पाण्याची गरज भागवतात.
आईस स्तूप बरोबरच वॉटर टँक देखील तयार करण्यात आली आहे. ज्यात पाणी साठून राहतं. गरजेनुसार वॉटर टॅंकमधून पाणी सोडलं जातं. त्यामुळे सिंचनासाठी मदत होते.
लेहतील वाखा गावातील सोनम दोर्जे कृत्रिम आईस स्तूप बनवण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा तेथील स्थानिक लोकांना होत आहे.
आईस स्तूपची संकल्पना सर्वात आधी लदाखच्या आईस मॅन चेवांग नॉर्फेलने केली. त्यांनी नांग गावात कृत्रिम हिमनदीची निर्मिती केली.
कृत्रिम आईस स्तूपच्या या प्रोजेक्टमध्ये अनेक परदेशी व्हॉलेंटियरही मदत करत आहेत.