idali : लुसलुशीत इडली सर्वांचाच आवडीचा विषय आहे. वाफाळत्या इडलीवर सांबारआणि चटणी घालून ताव मारणं म्हणजे अहाहा ! पण तुम्ही कधी कुल्फी इडली खाल्लेय का ?
कुल्फी इडली - सध्या सकाळचा हेल्दी नाश्ता म्हणून इडली खाल्ली जाते. कुल्फी इडली सध्या खूप फेमस आहे. पोपसिकल्स बनवण्याच्या मोल्डमध्ये तुम्ही इडली बॅटर घालायचं आहे, त्यांना स्टीम करा कुल्फी इडली तयार.
कोकोनट शेल इडली- नारळाची करवंटी स्वच्छ धुवून घ्या, त्यात इडली बॅटर घाला आणि स्टीम करून घ्या. कोकोनट शेल इडली तयार.
वाटी इडली- तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर ही उत्तम आयडिया आहे, एका भांड्यात पाणी घ्या त्यावर एक ताट ठेवा त्यात इडली बॅटर भरून छोट्या वाट्या ठेवा. त्यावर झाकण मारून वाफ काढून घ्या. वाटी इडली तयार.
अप्पे इडली- अप्पे बनवण्याच्या पात्रात इडली बॅटर घाला आणि ते स्टीम करा.अप्पे इडली तयार.
पॅन केक इडली - तव्यावर पॅन केकच्या आकारात इडली (idli) बॅटर ओता, यावेळी फक्त बॅटर जरा जाडसर घाला. पॅन केक इडली तयार.