PHOTOS

दहशतवाद, PoK, ऑपरेशन सिंदूर अन् रक्त....; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला जाहीर इशारा दिला आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, दहशतवादी तळं अशा सर्व मुद्द्यांवर नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या. 

 

 

Advertisement
1/10

"आम्ही दहशतवाद्यांना मातीत मिसळण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली होती. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतावादी संघटनेला आमच्या बहिणी, मुलींचा कपळावरुन सिंदूर हटवण्याचा काय परिणाम असतो हे समजलं आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही, तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे". 

 

2/10

"पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवाद, पाकिस्तानव्याप्त काश्मीवरवरच होईल असंही नरेंद्र मोदींनी जगाला सांगितलं आहे. शांतीचा मार्गही शक्तीतून जातो. भारतीयांनी शांततेत जगण्यासाठी, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत शक्तीशाली होणं गरज आहे. गरज लागल्यास या शक्तीचा वापरही गरजेचा आहे. मागील काही दिवसांत भारताने हेच केलं आहे".

 

3/10

पाकिस्तानी लष्कर, सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. जर पाकिस्तानला अस्तित्व टिकवायचं असेल तर दहशतवादाला संपवावं लागेल. याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. 

 

4/10

न्यूक्लिअर ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. त्या ठिकाणांवर भारत निर्णायक प्रहार करणार

 

5/10

दहशतवादी समर्थित सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने पाकिस्तानचं घाणेरडं सत्य पाहिलं. मारलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानचे मोठे अधिकारी पोहोचले होते. राज्य पुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सतत निर्णयाक पावलं उचलत राहू

 

6/10

"6 मेच्या रात्री आणि 7 मेच्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला सत्यात उतरताना पाहिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना, प्रशिक्षण केंद्रावर प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, भारत इतका मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकत्र येतो, देश पहिला या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वपरी असतं तेव्हा असे निर्णय घेतले जातात. परिणाम दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानने दहशतवादी ठिकाणांवर भारताने हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांची इमारतीच नाही, तर धैर्यही कोसळलं आहे. बहावलपूर आणि मुरीदसारखी दहशतवादी ठिकाणं एकाप्रकारे जागतिक दहशतवादाची युनिव्हर्सिटी राहिली आहे. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत त्या सगळ्याचं कनेक्शन यांच्याशी जोडलं आहे," असंही त्यांनी म्हटलं.

 

7/10

"एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. हे युग युद्धाचं नाही, पण हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स एका चांगल्या जगाची गरज आहे. पाकिस्तानी लष्कर, सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवतील. जर पाकिस्तानला वाचायचं असेल तर दहशतवादाला संपवावं लागेल. याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही. दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही".

 

8/10

"युद्धाच्या मैदानावर भारताने नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली आहे. आणि आता ऑपरेशन सिंदूरने नवा अध्याय जोडला आहे. आम्ही नव्या युगाच्या युद्धातही आमची श्रेष्ठता स्थापित केली आहे. मेड इन इंडियाच्या शस्त्रांची प्रामाणिकताही सिद्ध झाली आहे. 21 व्या शतकातील युद्धात मेड इन इंडिया शस्त्रांनी सिद्ध केलं आहे,"

 

9/10

"आम्ही दहशतवाद्यांना मातीत मिसळण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली होती. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतावादी संघटनेला आमच्या बहिणी, मुलींचा कपळावरुन सिंदूर हटवण्याचा काय परिणाम असतो हे समजलं आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही, तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे". 

 

10/10

आम्ही पाकिस्तानच्या दशतवादी आणि सैन्य ठिकाणांवर आमच्या प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे. आगामी दिवसात पाकिस्तान काय भूमिका घेत यावर सगळं अवलंबून असेल. आपली तिन्ही दलं, बीएसएफ सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची कारवाई आहे असंही मोदींनी सांगितलं आहे. 

 





Read More