PHOTOS

'मला विचारलं की, अनुष्काने टू-पीस बिकिनी...'; इम्रान खानने सांगितला 'तो' विचित्र किस्सा

Imran Khan On Question About Anushka Sharma Bikini: अभिनेता इम्रान खान हा चित्रपटांपासून दूर असला तरी चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्याला आलेल्या एक अवघडलेल्या प्रसंगाबद्दलही तो बोलला असून याचा संबंध अभिनेत्री अनुष्का शर्माशी आहे. नेमकं काय म्हणालाय इम्रान जाणून घ्या...

Advertisement
1/8

'जाने तू या जाने ना' फेम अभिनेता इम्रान खान मनोरंजन सृष्टीपासून दूर असला तरी त्याच्या मुलाखतींमुळे तो चर्चेत असतो. थेट, स्पष्टपणे बोलण्याचा इम्रानचा स्वभाव त्याच्या चाहत्यांना भावतोच मात्र त्याची झलक मुलाखतीमध्येही दिसून येते.

 

2/8

'कट्टी बट्टी' चित्रपटानंतर इम्रान मोठ्या पडद्यावर झळकलेला नाही. मात्र तो चित्रपटांमध्ये सक्रीय होता त्यावेळेस प्रसारमाध्यमांकडून सातत्याने त्याच्यावर टीका केली जायची. अनेकदा त्याची तुलना रणबीर कपूरसारख्या अभिनेत्यांबरोबर केली जायची.

 

3/8

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इम्रान खानने दशकभरापूर्वी आपण अधिक सावध होतो असं म्हटलं आहे. त्यावेळेस प्रसारमाध्यमांची विचारसणी संकुचित होती. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरील दृष्टीकोनही मर्यादीत होता. केवळ मालमसाला चोळून आमची वक्तव्य सादर केली जायची, असं इम्रान म्हणाला. 

4/8

2013 साली 'मटरू की बिजली का मंडोला' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा एक किस्सा इम्रानने आवर्जून सांगितलं. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस इम्रान खानला एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला.

 

5/8

'मटरू की बिजली का मंडोला' हा चित्रपट विशाल भरद्वाज यांनी दिग्दर्शित केला होता. प्रमोशनदरम्यान चित्रपटासंदर्भातील प्रश्न विचारण्याऐवजी पत्रकार मला सहकलाकरांच्या कपड्यांसंदर्भात विचार होते, असं इम्रान म्हणाला. 

 

6/8

"आम्ही एक गंभीर विषय मांडणारा चित्रपट म्हणून 'मटरू की बिजली का मंडोला'कडे पाहत होते. मला अचानक अशा एका रुममध्ये पाठवण्यात आलं की जिथे बरेच पत्रकार होते. अचानक मला कोणीतरी विचारलं की, "इस फिल्म मे अनुष्काजीने टू पीस बिकिनी पेहनी है| इसके बारे मे आप क्या कहोगे?" हा फारच गोंधळात टाकणारा आणि मला अस्वस्थ करणारा प्रश्न होता. मी विचार केला की यावर मी काय बोलणार?" असं इम्रानने 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगताना म्हटलं.

 

7/8

त्या काळामध्ये प्रसारमाध्यमे कशाप्रकारे बातम्या देण्यासाठी इम्रान खानच्या मामाच्या म्हणजेच आमिर खानच्या नावाचा वापर करायचे याबद्दलही इम्रान मुलाखतीत बोलला. "तुमच्या मामांनी हा चित्रपट पाहिला आहे का? त्यांची प्रतिक्रिया काय होती? असे प्रश्न मला विचारले जायचे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं नाव आम्ही उच्चारावं असा त्यांचा प्रयत्न असायचा," असं इम्रान म्हणाला.

 

8/8

"आता प्रसारमाध्यमे फार विकसित झाली असून संवेदनशीलही झाली आहेत. आता ते अनेक गोष्टींसंदर्भात स्वत:वर बंधने घालून घेतात. त्यावेळी सर्वजण केवळ शर्यतीत होते. मी मस्करीत केलेली विधानंही ते गांभीर्याने घ्यायचे. त्यांना माझी विनोदबुद्धी तसेच उपहास कळायचा नाही. मी असं असं म्हणालो हे ते गांभीर्याने बातम्यांमध्ये मांडायचा," असंही इम्रानने सांगितलं.

 





Read More