PHOTOS

पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...

Income Tax Raid in Agra: आयकर विभागाने आगरामधील तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले त्याशिवाय गेल्या काही काळात 100 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.

Advertisement
1/7

आयकर विभागाने आगरामधील तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले त्याशिवाय गेल्या काही काळात 100 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. 

2/7

पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल मोजण्यासाठी आयकर विभागाचे 30 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

3/7

या छापेमारीत बूट व्यावसायिकाच्या घरातून मोठी रोकड जप्त करण्यात आली. बेड आणि कपाटामध्ये नोटींचा खच सापडला. रात्रभर या पिशव्या मोजण्यामध्ये अधिकाऱ्यांचा वेळ गेला. 

4/7

या छापेमारीत 60 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागाला त्याच्याकडे करचोरी आणि बेहिशोबी मालमत्ता असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी हा छापा मारला. 

5/7

आयटी टीमने आग्रामधील एमजी रोडवरील बीके शूज, धाकरनमधील मंशु फूटवेअर आणि हेंग की मंडीमधील हरमिलाप ट्रेडर्स आणि जयपूर हाऊसमधील निवासस्थानातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणातील कागदपत्रांची झडती घेतली आणि छापा मारला. 

6/7

प्राप्तिकर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 60 कोटी रुपये रोख, सोने-चांदीचे दागिने तसंच कोट्यवधी रुपयांच्या जमिनीतील गुंतवणुकीची कागदपत्रे जप्त केले आहेत.

7/7

एकट्या हरमिलाप ट्रेडर्सचे मालक आणि व्यापारी रामनाथ डांग यांच्या घरातून 40 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या रक्कमेची अजूनही मोजणी सुरु आहे. 





Read More