PHOTOS

रिकी पॉटिंग, धोनीनंतर आता पँट कमिन्स, 2023च्या वर्ल्डकपमध्ये जुळून आला विचित्र योगायोग

2023च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा नाव कोरलं आहे. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे 241 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आणि भारतीयांचे विश्वविजेता होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळवलं

Advertisement
1/7
रिकी पॉटिंग, धोनीनंतर आता पँट कमिन्स, 2023च्या वर्ल्डकपमध्ये जुळून आला विचित्र योगायोग
 रिकी पॉटिंग, धोनीनंतर आता पँट कमिन्स, 2023च्या वर्ल्डकपमध्ये जुळून आला विचित्र योगायोग

Ind Vs Aus: ऑस्ट्रेलियाने तब्बल सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. कांगारूंनी टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताचे विश्वचषकाचे स्वप्न भंगल्यानंतर अनेक भारतीय चाहते निराश झाले आहेत. त्यातच सोशल मीडियावर मात्र, एक वेगळीच चर्चा पाहायला मिळत आहे. 

2/7
विश्वचषक 2023
विश्वचषक 2023

विश्वचषक 2023 यंदा भारतात पार पाडला. टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत दहाही सामने जिंकले होते. त्यामुळं यंदाचा वर्ल्डकप भारतातच येणार, अशा आशा समस्त भारतीयांना होती. मात्र, अंतिम सामन्यात भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यानंतर सोशल मीडियावर एक वेगळाच योगायोग जुळून आल्याची चर्चा आहे. 

3/7
अनोखा योगायोग
अनोखा योगायोग

 कर्णधार पँट कमिन्स याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया टीमने वर्ल्डकप जिंकला आहे. त्यानंतर आता कर्णधार कमिन्स एका वेगळ्याच ग्रुपमध्ये सहभागी झाला आहे. या काही कर्णधारानी लग्न गेल्यानंतर एका वर्षातच वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यांच्यात आता पँट कमिन्सच नावही सहभागी झालं आहे. 

4/7
पँट कमिन्स
पँट कमिन्स

 पँट कमिन्स यांने मागच्याच वर्षी त्याची प्रेयसी बॅकी बोस्टनसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर एका वर्षानंतर त्यांने विश्वचषकावर नाव कोरलं 

5/7
रिकी पॉन्टिंग
रिकी पॉन्टिंग

  या अनोख्या योगायोगाची सुरुवात रिकी पॉन्टिंगपासून झाली होती. 2002मध्ये रिकीने रियाना जेनिफरसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2003 मध्ये रिकीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. 

6/7
महेंद्र सिंह धोनी
महेंद्र सिंह धोनी

रिकीनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचे नाव येते. 2010मध्ये धोनीने साक्षीसोबत लग्न केले होते. त्यानंतर भारतीय संघाने 2011 साली 28 वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला होता. 

7/7
इयॉन मॉर्गन
 इयॉन मॉर्गन

त्याबरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनसोबतच हा योगायोग घडला होता. इयॉन मॉर्गनने 2018 मध्ये तारा रिजवेसोबत लग्न केले होते. त्यानंतर 1 वर्षानंतर 2019 मध्ये पहिल्यांदा इंग्लंडने विश्वचषक जिंकला होता. 





Read More