PHOTOS

IND vs BAN Pitch Report: भारत-बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि पीच रिपोर्ट

Champions Trophy 2025, IND vs BAN Pitch Report, Dubai Weather Forecast in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह  मोहिमेला सुरुवात करेल.

Advertisement
1/7
पाऊस खलनायक ठरू शकतो
पाऊस खलनायक ठरू शकतो

Champion Trophy 2025, India vs Bangladesh Pitch Report Dubai Weather Forecast in Marathi: अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला अखेरीस १९ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली असून आपल्या टीम इंडियाचा पहिला सामना  20 फेब्रुवारी रंगणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश असा हा सामना रंगणार आहे.  भारताने या सामन्यासाठी नेटमध्ये खूप घाम गाळला आहे, मात्र या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. अंदाज खरा ठरल्यास भारताला आपले प्लॅन्स बदलावे लागतील.

2/7
संघाकडे 5 फिरकीपटू
संघाकडे 5 फिरकीपटू

चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघाकडे 5 फिरकीपटू आहेत, ज्यापैकी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तिघांना संघात घेऊ शकते. पण भारताला ही योजना बदलावी लागू शकते कारण दुबई शहरात पाऊस हा चमत्कारापेक्षा कमी नाही. तिथे अनेकदा कृत्रिम पाऊसही पाडला जातो. 20 फेब्रुवारीला दुबईतही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

3/7
18 फेब्रुवारीला मुसळधार पाऊस
18 फेब्रुवारीला मुसळधार पाऊस

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी १८ फेब्रुवारीला मुसळधार पाऊस झाला होता. त्याचवेळी, 20 फेब्रुवारीच्या संदर्भात हवामान खात्याकडून एक मोठा अपडेट पाहायला मिळत आहे. इथे पावसामुळे स्पर्धेचा खेळ बिघडू शकतो.  20 फेब्रुवारीला अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

4/7
फिल्डिंग करताना येऊ शकतात अडचणी
फिल्डिंग करताना येऊ शकतात अडचणी

भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारी दुपारी सामना रंगणार आहे. या काळात कमाल तापमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. वातावरणातील आर्द्रता 49% असेल, त्यामुळे खेळाडूंना फिल्डिंग करताना खूप अडचणी येतील. तिथे  वारे ताशी 14 किमी वेगाने वाहतील.

5/7
कशी असेल खेळपट्टी?
कशी असेल खेळपट्टी?

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी समान समतोल मानल्या जात असल्याने गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळू शकते. जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी फलंदाजी करणे सोपे होईल. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनाही खेळपट्टीची मदत मिळण्याची शक्यता आहे.  संघाला नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणे उपयुक्त ठरेल. 

 

6/7
जिंकण्याचा उद्देश
जिंकण्याचा उद्देश

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला 3-0 ने पराभूत केल्यानंतर टीम इंडिया ही मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. तर शेवटच्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजकडून क्लीन स्वीप झालेल्या बांगलादेश संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीत सुधारणा करायची आहे.

7/7
भारताचे सगळे सामने दुबईत
भारताचे सगळे सामने दुबईत

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारी होणारा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तान आणि यूएई संयुक्तपणे आयोजित करत आहे. भारत आपले सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे.

 





Read More