PHOTOS

IND vs BAN : टीम इंडियाला धक्का! बांगलादेशचा 'हा' खासदार भारताविरुद्ध खेळणार टेस्ट मॅच, चीफ सिलेक्टरची घोषणा

IND vs BAN Test Series : बांगलादेशमध्ये मोठ्या गदारोळानंतर सत्तापालट झालं. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सर्व समीकरणं बदलली आहे. अशातच आता बांगलादेशचा खासदार भारताविरुद्ध क्रिकेट खेळणार म्हणतोय...

Advertisement
1/5
टेस्ट मालिका
 टेस्ट मालिका

भारत आणि बांगलादेश यांच्यात टेस्ट मालिका खेळवली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळवला जाईल. अशातच एका खासदाराची बांगलादेशच्या स्कॉडमध्ये एन्ट्री होणार आहे.

2/5
शकीब अल हसन
शकीब अल हसन

हा खासदार दुसरा तिसरा कोणी नसून शकीब अल हसन आहे. शकीब अल हसन भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेट खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता बांगलादेशच्या मुख्य निवडकर्त्याने उत्तर दिलंय.

3/5
गाझी अश्रफ हुसेन
गाझी अश्रफ हुसेन

बांगलादेशचे मुख्य निवडकर्ता गाझी अश्रफ हुसेन यांनी शाकिब भारतात कसोटी सामने खेळणार असल्याचं जवळपास स्पष्ट केलं आहे.

4/5
पाकिस्तान मालिका
पाकिस्तान मालिका

शाकिब 4 किंवा 15 ऑगस्टच्या आसपास संघात (पाकिस्तान मालिकेसाठी) सामील होण्याची अपेक्षा आहे आणि तो सर्व कसोटी सामने खेळेल, असं गाझी अश्रफ हुसेन यांनी स्पष्ट केलंय. 

5/5
बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य स्कॉड
बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य स्कॉड

रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान (WK), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.





Read More