Ind vs Eng 4th Test Jasprit Bumrah Recrod: चौथ्या कसोटीमध्ये बुमराहकडे एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवण्याची सुवर्णसंधी आहे. बुमराहची ही मालिकेतील शेवटची कसोटी असेल. त्यामुळे हा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची ही बुमराहकडे अखेरची संधी आहे. हा विक्रम कोणता आणि या यादीत कोण कोण आहे पाहूयात...
बुमराहकडे आज एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी असली तरी ही शेवटची संधी आहे की काय अशी चर्चाही सुरु झाली आहे. नेमका हा विक्रम काय आणि ही शेवटी संधी का म्हटलं जातंय पाहूयात...
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करणार आहे.
चौथी कसोटी सुरु होण्याआधी बुमराह एका ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.
बुमराहने अँडरसन-तेंडुलकर मालिकेमध्ये अजून पाच विकेट्स घेतल्या तर त्याच्या नावावर एक अत्यंत अनोखा विक्रम नोंदवला जाईल.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आशियाई देशांमधील खेळाडू होण्याचा मान अजून पाच विकेट्स घेतल्यास बुमराहला मिळेल. मात्र बुमराह या मालिकेतील शेवटची कसोटी खेळण्याची शक्यता फारस धुसर असून भविष्यातील इंग्लंड दौऱ्याबद्दल अजून काहीही निश्चित नसताना ही बुमराहसाठी शेवटी संधी आहे का अशी चर्चाही सुरु आहे.
सध्या हा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोंलदाज वसीम अक्रमच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडमध्ये 14 कसोटी सामन्यांमध्ये 53 धावा केल्या आहेत. तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आशियाई खेळाडूंच्या यादीत इशांत शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये 51 विकेट्स घेतल्यात.
सध्या बुमराह या यादीत तिसऱ्या स्थानी असून त्याच्या नावावर इंग्लंडमध्ये खेळलेल्या 11 कसोटी सामन्यांत 49 विकेट्सची नोंद आहे.
चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद आमिर आहे. त्याने इंग्लंडमधील 12 कसोटी सामन्यांमध्ये 49 विकेट्स घेतल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा क्रमांक लागतो. त्याने अवघ्या 6 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडमधील मैदानांवर तब्बल 48 विकेट्स घेतल्या आहेत.