भारत आणि इंग्लड या दोन संघात रोमांचक अशी टेस्ट सीरिज पूर्ण झाली आहे. या पाच दिवसांच्या सामन्याने क्रिकेट प्रेमींचे सर्वोत्तम मनोरंजन केले. या सीरिजमध्ये 5 मोठे वाद पाहणार आहोत. जे या दिवसांमध्ये अतिशय चर्चेत आले.
संपूर्ण जग प्रत्येक चेंडूकडे लक्षपूर्वक पाहत होते. सिराजने जेमी स्मिथला बाद करून आणि नंतर धोकादायक दिसणाऱ्या गस अॅटकिन्सनला क्लिन बॉलिंग करून भारताच्या संधी मजबूत केल्या, ज्यामुळे भारताला केवळ सामना जिंकता आला नाही तर मालिकेत २-२ अशी बरोबरी साधता आली.
जेव्हा मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा, १.२५ अब्ज भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे वाहून, पाचव्या दिवशी चेंडू घेऊन मैदानावर धावू लागले, तेव्हा ते फक्त गोलंदाजी करत नव्हते तर क्रिकेट इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्याची पटकथा लिहित होते. लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी, इंग्लंडला जिंकण्यासाठी ३५ धावांची आवश्यकता होती आणि भारत विजयापासून चार विकेट्स दूर होता.
या पाच दिवसांत क्रिकेट प्रेमींनी सर्वोत्तम गोलंदाजी, फलंदाजी तर अनुभवलीच. पण यासोबत पाच दिवसांच्या या कसोटी सामन्यात वाद देखील पाहिले. भारतीय संघातील खेळाडू थेट इंग्रजांशीच भिडल्याच दिसलं आहे. ते वाद कोणते हे पाहणार आहोत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओव्हल येथे खेळला गेला. भारताने हा सामना फक्त ६ धावांनी जिंकला आणि मालिका बरोबरीत आणली. आता आम्ही तुम्हाला या मालिकेत झालेल्या ५ मोठ्या वादांबद्दल सांगणार आहोत. त्यावर एक नजर टाकूया.
लॉर्ड्स कसोटीदरम्यान इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल यांच्यात जोरदार वाद झाला. इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आणि दिवस संपण्याच्या बेतात होता. अशा परिस्थितीत जॅक क्रॉली जास्त फलंदाजी करू नये म्हणून वेळ वाया घालवत होता. त्याच्या या कृत्यामुळे कर्णधार शुभमन गिल संतापला, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार वाद झाला. भारतीय संघ मैदानावर सराव करत असताना ते तिथे आले आणि भारतीय संघाला पिचपासून २.५ मीटर दूर राहण्यास सांगितले. त्यांची बोलण्याची पद्धतही योग्य नव्हती. गंभीरला हे अजिबात आवडले नाही आणि तो येऊन म्हणाला, 'तुम्ही ग्राउंड्समन आहात, तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगणार नाही.' ली फोर्टिस स्वतः इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी खेळपट्टीवर उभे राहून बोलताना दिसले.
ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात कुमार धर्मसेना आणि केएल राहुल यांच्यात जोरदार वाद झाला. खरंतर, पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णा आणि जो रूट यांच्यात वाद झाला होता, जो पंच कुमार धर्मसेना यांनी थांबवला होता. यानंतर, केएल राहुल त्याच्या सहकाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी पंचांकडे गेला. दोघांमध्ये वाद झाला. राहुल म्हणाला, 'तुम्हाला काय हवे आहे, आपण फलंदाजी आणि गोलंदाजी केल्यानंतर घरी जावे?' यानंतर धर्मसेना म्हणाला, 'आपण सामन्याच्या शेवटी बोलू, तुम्ही असे बोलू शकत नाही.'
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दिवसाच्या अखेरीस भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आला आणि सामना अनिर्णित करू इच्छित होता. पण जडेजाने नकार दिला. दोन्ही खेळाडूंनी प्रथम त्यांचे शतक पूर्ण केले आणि नंतर सामना अनिर्णित करण्यासाठी हात वर केले. या संपूर्ण घटनेनंतर बराच गोंधळ उडाला. ब्रिटिशांनी असे म्हटल्यावर आपण सामना ड्रा करावा अशी त्यांची इच्छा होती.
या संपूर्ण मालिकेत ड्यूक बॉलवरून खूप वाद झाला. या मालिकेदरम्यान चेंडू खूप लवकर खराब होत असल्याचे दिसून आले. पंचांना वारंवार चेंडू बदलावा लागला. दोन्ही संघ ड्यूब बॉलवर खूश नव्हते.