PHOTOS

विराट, गावसकर, द्रविड सारेच पडले मागे! 57 धावा करुन यशस्वीने मोडलेल्या विक्रमांची यादी पाहाच

swal: 58 बॉलमध्ये 57 धावा ही खेळी कसोटीसाठी वेगवान वाटत असली तर लक्षात ठेवण्यासारखा हा आकडा नाही असं म्हणता येईल. मात्र यशस्वी जयसवालने...

Advertisement
1/13

भारताचा तरुण फळंदाज यशस्वी जयसवालने इंग्लंडविरुद्धच्या धरमशालामधील कसोटीमध्ये अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. 58 बॉलमध्ये 57 धावा करत यशस्वीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. हे विक्रम कोणते ते पाहूयात...

2/13

विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सध्याचा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकण्याबरोबरच क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज असलेल्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत यशस्वीचा समावेश झाला आहे.

3/13

सर डॉन ब्रॅडमन हे कसोटीमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. ब्रॅडमन यांनी आपल्या एक हजार धावा केवळ 7 कसोटीमध्ये पूर्ण केल्या. जयसवालने हा टप्पा गाठण्यासाठी 9 कसोटी सामने लागले. या यादीमध्ये जयसवाल दुसऱ्या स्थानी आहे.

 

4/13

जयसवालबरोबरच वेस्ट इंडीजचे एव्हर्टन विक्स, इंग्लडचे हरबर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडिजचे 9 जॉर्ज हेडली यांनी प्रत्येकी 9 कसोटींमध्ये 1 हजार धावांचा टप्पा गाठला. यशस्वीने 9 कसोटींमध्ये 1 हजार धावा पूर्ण करुन सुनील गावसकर आणि चेतेश्वर पुजारा यांना मागे टाकलं. या दोघांच्या नावावर आधी हा विक्रम होता. दोघांनी 11 कसोटींमध्ये 1 हजार धावा केलेल्या.

 

5/13

दरम्यान, 1 हजार धावा पूर्ण करताना सर्वोत्तम सरासरी असलेल्या भारतीय फलंदाजांच्या यादीत यशस्वीने सुनील गावसकरांना मागे टाकलं आहे. सर्वोत्तम सरासरी ठेवत 1 हजार धावा पूर्ण करणाऱ्या भारतीयांमध्ये विनोद कांबळी 88.33 च्या सरासरीने पहिल्या स्थानी आहे.

6/13

विनोद कांबळे खालोखाल या यादीत चेतेश्वर पुजारा (71.43) आणि यशस्वी जयसवाल (71.43) सहीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. सुनील गावसकरांची सरासरी 62.50 इतकी आहे. या यादीत टॉप फाइव्ह फलंदाजांमधील यातील पाचव्या स्थानी मयांक अगरवाल 55.56 सहीत पाचव्या स्थानी आहे. 

 

7/13

सर्वात कमी वयात एक हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयसवालने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. सचिन तेंडुलकरने 19 वर्ष 217 दिवसांमध्ये 1 हजार धावांचा टप्पा गाठला होता. त्या खालोखाल कपील देव यांनी 21 वर्ष 27 दिवसांचे असताना हा विक्रम केला.

 

8/13

रवि शास्त्री यांनी 21 वर्ष 197 दिवसांचे असताना हजार धावांचा टप्पा गाठला. यशस्वीने हा टप्पा गाठला तेव्हा त्याचं वय 22 वर्ष 70 दिवस इतकं होतं. दिलीप वेंगसरकर हे यादीत 22 वर्ष 293 दिवसांसहीत पाचव्या स्थानी आहेत.

9/13

एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या दिवसांच्या बाबतीत विचार केल्यास यशस्वी जयसवालने अंतरराष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. मायकल हसीने 166 दिवसांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अॅडम मार्करमने 185 दिवसांत एक हजार धावा केल्या.

10/13

ऑस्ट्रेलियाच्या अॅडम वोग्सने 207 दिवसांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. यशस्वीने 1 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 239 दिवस घेतले. इंग्लंडच्या हरबर्ट सटक्लिफने 244 दिवसांमध्ये 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून यापूर्वी सर्वात कमी वयात एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावे होता. त्याने 299 दिवसांमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

 

11/13

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयसवालने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र अजून एक डाव बाकी असल्याने यशस्वीकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. सध्या या यादीत पहिल्या स्थानी सुनील गावसकर आहेत. त्यांनी 1971 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 774 धावा केलेल्या.

 

12/13

दुसऱ्या स्थानीही गावसकर असून वेस्ट इंडिजविरुद्धच 1978-79 साली झालेल्या कसोटी मालिकेत त्यांनी 732 धावा केलेल्या. जयसवाल इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या 5 कसोटींच्या मालिकेत एका डावातील फलंदाजी शिकल्लक असताना 712 धावा केल्यात.

 

13/13

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या या यादीत विराट कोहलीला यशस्वीने मागे टाकलं आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 2014-15 मध्ये 692 धावा केल्या होत्या. पाचव्या स्थानीही विराट कोहलीच असून त्याने इंग्लंडविरुद्धच्या 2016 च्या कसोटी मालिकेत 655 धावा कुटलेल्या.

 





Read More