Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनी कोणत्या ठिकाणी कोणत्या आकाराचा तिरंगा फडकवतात? पाहा महत्त्वाची माहिती...
...ध्वजारोहणासंबंधीच्या शिष्टाचारानुसार तिरंग्याची उंची आणि रुंदी यांच्यामध्ये 3:2 असा आयताकृती आकार असणं अपेक्षित आहे.
एखाद्या कार्यालयामध्ये 6*4 इंचांचा तिरंगा टेबलावर ठेवणं योग्य. VVIP वाहनांसाठी हा आकार 9*6 इंच इतका असावा. संसद आणि काही मध्यम आकाराच्या सरकारी इमारतींवर 9*6 फुटांचा तिरंगा असावा.
राष्ट्रपतींसाठी सेवेत असणाऱ्या VVIP विमानं आणि रेल्वेंसाठी तिरंगा ध्वजाचा आकार 18*12 इंच निश्चित करण्यात आला आहे. तर अनेक खोल्यांमध्ये एकमेकांना छेदून जाणाऱ्या दांडीवर असणारे ध्वज 3*2 फुटांचे असतात.
शहीद सैनिकांच्या पार्थिवावर असणारा तिरंगा 6*4 फुट इतका मोठा असावा. गन कॅरिएज, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवनावरील तिरंगा 12*8 फुटांचा असावा. एखाद्या लहान सार्वजनिक इमारतीवर असणारा तिरंगा 5.5*3 फुटांचा असावा. तर, मोठ्या सरकारी इमारतीवरील तिरंगा 21*14 फुटांचा असावा.
ध्वजारोहणासाठी जी व्यक्ती पुढाकार घेते त्यांनी तो योग्य दिशेनं फडकवण्यात येत आहे याबाबत लक्ष ठेवा. जेणेकरून केशरी रंग वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्या.
ध्वजारोहणासाठी वापरात येणाऱ्या ध्वजाच्या तिनही रंगांपैकी एकही रंगाचं नुकसान झालेलं नसावं. फडकवलेला ध्वज जमीन किंवा पाण्याला स्पर्श करत नसावा याची काळजी घेत असावं. थोडक्यात ध्वजाचं कोणत्याही प्रकारे नुकसान झालेलं नसावं.
देशाची नागरिक, एखादी खासगी संस्था किंवा शैक्षणिक संस्था सर्व प्रसंगी ध्वज फडकवू शकतात. आता तिरंगा कोणत्याही वेळी फडकवता येतो.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवरून घेण्यात आलेली आहे. सर्व छायाचित्रे- फ्रिपिक)