PHOTOS

'या' 9 कारणांमुळे INDIA च्या मुंबईतील बैठकीवर दिल्लीचीही असेल बरीक नजर

India Alliance Mumbai Meeting:  विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे. ही या आघाडीची तिसरी बैठक आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. हे निर्णय नेमके कोणते आणि त्याकडे सत्ताधाऱ्यांचंही का लक्ष आहे जाणून घेऊयात...

Advertisement
1/13

विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे. ही या आघाडीची तिसरी बैठक आहे.

2/13

I.N.D.I.A आघाडीची पहिली बैठक जून महिन्यात पाटण्यात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात बंगळुरुमध्ये दुसरी बैठक झाली.

3/13

आता मुंबईत तिसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडणार आहे आणि ती फार महत्त्वाची का आहे जाणून घेऊयात...

4/13

I.N.D.I.A आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाण्याची शक्यता.

5/13

या बैठकीमध्ये I.N.D.I.A आघाडीचे संयोजक कोण असतील हे निश्चित केलं जाणार आहे.

6/13

I.N.D.I.A च्या कॉर्डिनेशन कमिटीची स्थापना होईल. मात्र काहीजणांच्या मते ही कमिटी नंतर स्थापन केली जाईल.

7/13

दिल्लीमधील मुख्यालयासंदर्भात I.N.D.I.A च्या या बैठकीमध्ये चर्चा होईल.

8/13

I.N.D.I.A चे प्रवक्ते कोण असतील याची चर्चा होईल. यामुळे आघाडीच्या मतांमध्ये एक वाक्यता येईल.

9/13

भविष्यात जनतेशी संबंधित संयुक्त मोर्चे आणि जनतेशीसंबंधित आंदोलनांबद्दल चर्चा केली जाईल.

10/13

इतरही पक्षांना I.N.D.I.A आघाडीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी चर्चा केली जाईल.

11/13

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी कशाप्रकारे वाटचाल करेल यावरही चर्चा होईल.

12/13

जागावाटपाच्या मुद्द्यावरही मुंबईतील I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

13/13

अनेक महत्त्वाचे निर्णय I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत होणार असल्याचे सत्ताधाऱ्याचंही या बैठकीकडे लक्ष असणार आहे.





Read More