PHOTOS

IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Advertisement
1/7
पाकिस्तानचा धुव्वा उडवला
पाकिस्तानचा धुव्वा उडवला

हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हॉकी 5S आशिया चषकात भारताने पाकिस्तानवर 6-4 असा विजय मिळवला आहे. 

2/7
हॉकी 5S फॉरमॅट
हॉकी 5S फॉरमॅट

अंतिम फेरीत भारताकडून मनदीप मोर (कर्णधार), सूरज करकेरा, जुगराज सिंग, मनिंदर सिंग आणि पवन राजभर यांनी मैदानात उतरले होते. हॉकी 5S फॉरमॅटमध्ये दोन्ही संघाचे 5 प्लेयर मैदानात उतरतात.

3/7
भारतीय खेळाडूंनी दम दाखवला
भारतीय खेळाडूंनी दम दाखवला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अधिक रोमांचक झाला. पाकिस्तानचा संघ पहिल्या हाफनंतर 3-2 असा आघाडीवर होता. पण भारतीय खेळाडूंनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये दम दाखवला.

4/7
निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये
निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये

दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाने आपला खेळ उंचावला आणि सामना 4-4 च्या स्थितीत आणला. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला.

5/7
पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी
पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी

पॅनेल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांना एकही गोल करता आला नाही.

6/7
पॅनेल्टी शूटआऊट
पॅनेल्टी शूटआऊट

पॅनेल्टी शूटआऊटमध्ये भारताने दोन अचूक गोल करत 2-0 ने पॅनेल्टी शूटआऊट जिंकला. मनदीर सिंह याने विजयात मोठी भूमिका बजावली.

7/7
5S हॉकी विश्वचषक 2024 साठी पात्र
5S हॉकी विश्वचषक 2024 साठी पात्र

दरम्यान, याआधी भारताने 35 गोल करत जपानी संघाचा पराभव केला होता. आता भारतीय हॉकी संघ 5S हॉकी विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला आहे.





Read More