भारतात अशीही एक नदी आहे जिला स्पर्श करायलाही लोक घाबरतात, असं कोणी तुम्हाला सांगितलं तर? विश्वास बसेल का?
India cursed river: भारत हा देश विविध संस्कृती, परंपरांनी नटलाय. आपल्या देशाला जाज्वल्य असा इतिहास आहे. तसेच भूगोलही आहे. भारतातील अनेक गोष्टींबद्दल आपल्याला फारशी कमी माहिती असते.
भारतात लोक या नदीच्या पाण्याला स्पर्श करायलाही घाबरतात, त्याला स्पर्श करताच सर्व चांगले कर्म नाहीसे होते, असे मानले जाते.
भारतात नद्यांना खूप आदर दिला जातो. नद्यांना पवित्र मानले जाते आणि त्यांची देवी आणि माता म्हणून पूजा केली जाते.
पण भारतात अशीही एक नदी आहे जिला स्पर्श करायलाही लोक घाबरतात, असं कोणी तुम्हाला सांगितलं तर? विश्वास बसेल का?
लोकांना त्या नदीच्या पाण्याला स्पर्शही करायला आवडत नाही. भारतात वाहणाऱ्या या नदीला स्पर्श केल्याने लोकांचे सर्व पुण्य वाया जाते असे मानले जाते. त्या नदीचे नाव कर्मनाशा असे आहे.
हे नाव कर्म आणि नाश या दोन शब्दांपासून बनलंय. याचा अर्थ असा की तुम्ही केलेले सर्व चांगले कर्म किंवा सत्कर्मे नष्ट होतात.
बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून वाहणारी ही नदी शापित मानली जाते.
याच कारणामुळे लोकांना त्या नदीच्या पाण्याला स्पर्श करायलाही आवडत नाही. कर्मनाशा नदी बिहारमधून उगम पावते आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधून वाहते.
(Desclaimer: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य ज्ञानावर आधारित आहे. 'झी 24 तास' याला दुजोरा देत नाही.)