PHOTOS

एका पिक्चरसाठी 200 कोटी मानधन घेणारा भारतीय डायरेक्टर; SRK, सलमानपेक्षाही अधिक कमवतो

Highest Paid Director In India: देशातील सर्वाधिक मानधन घेणारा दिग्दर्शक कोण असं विचारलं तर तुम्ही ज्या नावांचा विचार आधी कराल त्यापैकी हे नाव नक्कीच नाही. मग ही व्यक्ती आहे तरी कोण?

Advertisement
1/13

एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणार की आपटणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. या गोष्टींमध्ये अगदी चित्रपटात एखादा सुपर स्टार अभिनेता आहे का इथपासून चित्रपटाचं संगीत आणि अगदी पटकथेचाही समावेश असतो. मात्र चित्रपटाची मोट बांधणारी मुख्य व्यक्ती असते ती म्हणजे दिग्दर्शक! 

 

2/13

चित्रपट निर्मितीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी दिग्दर्शक असतो. तोच या साऱ्याचं नेतृत्व करत असतो. खरं तर त्याच्या नजरेतूनच प्रेक्षक चित्रपट पाहतात. हल्ली प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना चित्रपटगृहांपर्यंत घेऊन येण्यासाठी स्टार कलाकारांना भरमसाठ पैसे दिले जातात. कलाकारांच्या नावावर चित्रपट खपतात. मात्र भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा दिग्दर्शक सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या कलाकारांपेक्षाही जास्त पैसे घेतो, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

 

3/13

भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा हा चित्रपट दिग्दर्शक दाक्षिणात्य आहे. ज्या दिग्दर्शकाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, एसएस राजामौली!

 

4/13

'आयएमडीडी'नुसार, तेलुगू चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांना दिग्दर्शक म्हणून काम सोपवताना तब्बल 200 कोटी रुपये मानधन देतात. ही रक्कम वेगवेगळ्या प्रकारे दिली जाते. 

 

5/13

एसएस राजामौली यांना प्रामुख्याने काम सुरु होण्याआधी दिलेली आगाऊ रक्कम, चित्रपटाच्या कमाईमधील नफ्यातला वाटा आणि चित्रपटाच्या मालकी हक्कांच्या विक्रीतून मिळणारा बोनस अशी टप्प्याटप्प्यांमध्ये 200 कोटींची रक्कम दिली जाते. 

 

6/13

चित्रपटाच्या यशावर एसएस राजामौलींची कमाई अधिक वाढू शकते. चित्रपटाच्या यशावरच त्यांना मिळणाऱ्या पैशांची टक्केवारी निश्चित होते. जितका नफा अधिक तितके पैसे अधिक असा साधा हिशोब असतो.

 

7/13

उदाहरणार्थ, एसएस राजामौलींनी दिग्दर्शित केलेला 'आरआरआर' हा चित्रपट जागतिक स्तरावर यशस्वी झाला आणि त्याला अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर्स पुरस्कारही मिळाला. बाहुबली फ्रँचायझीच्या यशानंतर राजामौली यांना पहिल्यांदाच मानधन म्हणून 200 कोटी रुपये देण्यात आल्याचं यानिमित्ताने समोर आलं.

 

8/13

एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन घेणारे एसएस राजामौली हे देशातील पहिलेच दिग्दर्शक ठरले. 

 

9/13

खरं तर, शाहरुख खान आणि सलमान खान यासारखे भारतातील काही नामवंत सुपरस्टार प्रत्येक चित्रपटाच्या माध्यमातून सुमारे 150 ते 180 कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. राजामौली यांचे मानधन त्यांच्यापेक्षा जास्त आहे.

 

10/13

'आरआरआर'चे उत्तर भारतात प्रमोशन करण्यात आले तेव्हा दक्षिण उद्योगातील दोन प्रमुख अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर असूनही, राजामौली यांचा चित्रपट म्हणून त्याचे मार्केटिंग करण्यात आले.

 

11/13

'बाहुबली' चित्रपटामुळे एसएस राजामौलींना संपूर्ण भारतात अगदी घरोघरी लोकप्रियता मिळाली.

 

12/13

एसएस राजामौलींच्या 'बाहुबली 2'ने हिंदीमध्ये 510 कोटी रुपये कमावले. 2023 मध्ये 'पठाण' प्रदर्शित होईपर्यंत सहा वर्षांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बाहुबली हाच हिंदी चित्रपट ठरला होता.

 

13/13

त्याचप्रमाणे, एसएस राजामौलींच्याच 'आरआरआर'ने देखील तिकिट खिडकीवर प्रभावी व्यवसाय केला, त्याच्या हिंदी आवृत्तीने 270 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.





Read More