Highest Paid Musician In India: भारतामध्ये सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार कोण असा प्रश्न विचारल्यास तुम्ही ए.आर. रेहमान, दिलजीत दोसांज वगैरे नावं घ्याल. मात्र ही उत्तर चुकीची आहेत असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. देशातील सर्वात श्रीमंत संगीतकार हा अवघ्या 33 वर्षांचा तरुण आहे. तो कोण आणि त्याने काय काम केलं आहे ते पाहूयात...
देशातील सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार कोण? या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला सांगता येणार नाही. बरं हे नाव वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल यातही शंका नाही. ही व्यक्ती आहे कोण ते पाहूयात...
सध्या 'छावा' चित्रपटामुळे संगीतकार ए. आर. रेहमान चर्चेत आहे. अनेकांना या चित्रपटाचं संगीत आवडलंय तर बऱ्याच जणांनी पार्श्वसंगीतात चित्रपटाने मार खाल्ल्याचं म्हटलं आहे.
खरं तर मागील अनेक वर्षांपासून संगीतकार ए.आर. रेहमान हा सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार राहिला आहे.
खरं तर ए. आर. रेहमानचा प्रत्येक अल्बम हिट झाल्याने तो एक एका गाण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतो. त्याच्याहून अधिक कमाई करणारा कोणताही संगीतकार अगदी आतापर्यंत देशात नव्हता.
मात्र 2023 साली एका तरुण संगीतकाराने कमाईच्या बाबतीत ए. आर. रेहमानलाही मागे टाकलं आहे.
हा तरुण संगीतकार सध्या देशातील सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार आहे. विशेष म्हणजे हा संगीतकार नऊ आकड्यांचं मानधन घेतोय आणि ते ही वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी!
खरं तर तुम्ही सुद्धा या संगीतकराने रचलेली गाणी ऐकली असती आणि त्यावर मनसोक्तपणे नाचलाही असाल. आपण ज्या संगीतकाराबद्दल बोलतोय तो अरजीत किंवा दिलजीत दोसांज किंवा प्रितम वगैरे नाही. हा संगीतकार ए. आर. रेहमानप्रमाणेच दाक्षिणत्य संगीतकार आहे.
या 33 वर्षीय संगीतकाराने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यापूर्वी त्याने रजनीकांतचा 'जेलर', 'पेट्टा', विजय थालापतीचा 'मास्टर', धानुषचा 'मारी' आणि 'विक्रम'सारख्या चित्रपटांना संगीत दिलेलं आहे.
आता एवढ्या मोठ्या मोठ्या चित्रपटांना संगीत देणारा संगीतकार नक्कीच देशातील सर्वाधिक कमाई करणार संगीतकार असणार यात शंका नाही.
ज्या संगीतकाराबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, अनिरुद्ध रविचंद्र!
शाहरुखच्या 'जवान'साठी अनिरुद्धने 10 कोटी रुपये मानधन घेतल्याचं वृत्त 'न्यूज 18' ने दिलं आहे. या कमाईसहीत अनिरुद्धने प्रत्येक चित्रपटामध्ये 7 ते 8 कोटी कमवणाऱ्या ए. आर. रेहमानलाही मागे टाकलं आहे.
विशेष म्हणजे 'जवान'नंतर अनिरुद्धने आपल्या मानधनामध्ये कपात केली. त्याने 'लिओ' आणि 'जेलर' या चित्रपटांसाठी 8 कोटी मानधन घेतल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने म्हटलं आहे. असं असलं तरी तो सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार आहे.
अनिरुद्धचं वैशिष्ट्यं म्हणजे तो टेक्नो म्युझिक आणि कलाकारांचं खरा आयुष्यातील कॅरेक्टर या दोघांचा उत्तम मेळ साधतो.
त्यामुळेच अनिरुद्धने रजनीकांत (पेट्टा, जेलर), कमल हसन (विक्रम), विजय (मास्टर, लिओ) आणि शाहरुख खान (जवान) यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांना संगीत दिलं आहे. तो आता शाहरुख, ज्यूनिअर एनटीआर, रजनी आणि विजयच्या कॅम्पचा भाग झाला आहे.
अनिरुद्धबरोबरच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या संगीतकारांमध्ये प्रतिम, विशाल-शेखर, एम. एम. करवानी आणि युवान शंकर राजा यांचा समावेश आहे. हे सर्वजण एका चित्रपटासाठी 5 कोटी मानधन घेतात. अनेक गायक प्रत्येक गाण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये मानधन घेतात.