Miss World in India: मिस वर्ल्ड ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाची सौंदर्यस्पर्धा आहे. जगभरात या सोहळ्याची चर्चा रंगते. तेव्हा येत्या डिसेंबर महिन्यातही हा सोहळा रंगणार आहे. यावेळी भारताला या सोहळ्याचा मान मिळाला आहे.
मिस वर्ल्ड ही सर्वात मोठी आणि लोकप्रिय सौंदर्यस्पर्धा आहे. यंदा डिसेंबरमध्ये होणार हा सोहळा भारतात आयोजित करण्यात आला आहे.
याबद्दलची एक पत्रकार परिषद दिल्ली येथे पार पडली. 71 वा मिस वर्ल्डचा सोहळा हा भारतात आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी मिस वर्ल्ड संस्थेच्या सीएओही उपस्थित होत्या.
यावेळी 130 देशातील सौदर्यवती आपल्या सौंदर्यानं, बुद्धिमत्तेनं आणि आत्मविश्वासानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतील.
1996 नंतर आता भारतात हा सोहळा पार पडणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या सोहळ्याचे अनावरण होईल.
तेव्हा सगळ्यांनाच या सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 2017 मध्ये 20 वर्षीय मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता.