Pune Ranked Ahead Of Mumbai In This Unwanted List: एका जागतिक कंपनीने जारी केलेल्या या यादीमधील पहिल्या दहा शहरांची नावं पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
पुणे शहराचा जागतिक स्तरावरील एका नकोश्या यादीत समावेश झाला असून त्यांनी मुंबईकरांनाही मागे टाकलं आहे. ही यादी आहे तरी काय पाहूयात आणि त्यात देशातील कोणती शहरे आहेत जाणून घेऊयात...
भारतामधील सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजेच वाहतूक कोंडी असणारं शहर कोणतं? असा प्रश्न विचारला तर नक्कीच मुंबई, बंगळुरु अशा शहरांची नावं आपल्यापैकी अनेकजण घेतील. मात्र या यादीमध्ये खरोखरच पहिल्या स्थानी असलेल्या शहराचं नाव पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे राजधानी मुंबई अथवा उपराजधानी असलेलं नागपूर नाही. या यादीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे जागतिक स्तरावरही सर्वाधिक ट्रॅफिक जॅमच्याबाबतीत चौथ्या स्थानी आहे.
2024 साली देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे कोलकाता असल्याचं डच लोकेशन टेक्नोलॉजी स्पेशलिस्ट कंपनी असलेल्या टॉम टॉमच्या अहवालामधून समरो आलं आहे. यापूर्वी मागील वर्षी पहिल्या स्थानी बंगळुरु शहर होतं. यंदा बंगळुरु दुसऱ्या स्थानी आहे.
कोलकात्यामध्ये 10 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी सरासरी 34 मिनिटं 33 सेकंदांचा कालावधी लागतो. त्या खालोखाल बंगळुरुचा क्रमांक लागत असून या शहरात 10 किमी अंतर कापायला 34 मिनिटं 10 सेकंद लागतात.
महाराष्ट्रातील लोकांसाठी आश्चर्याची बाब म्हणजे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे पुणे ठरलं आहे. पुण्यात 10 किलोमीटरचं अंतर कापायला सरासरी 33 मिनिटं लागतात. पुण्याखालोखाल चौथ्या क्रमांकावर हैदराबादचा क्रमांक लागतोय. इथे 10 किलोमीटर अंतर 32 मिनिटांमध्ये कापता येतं.
सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या अव्वल दहा शहरांमध्ये पाचव्या स्थानी चेन्नई (10 किमी अंतरासाठी सरासरी 30 मिनिटांचा वेळ), सहाव्या स्थानी मुंबई (सरासरी 29 मिनिटं), अहमदाबाद (सरासरी 29 मिनिटं) सातव्या स्थानी आहे.
सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीत एर्नाकुलम (सरासरी 29 मिनिटं) आठव्या, जयपूर (सरासरी 28 मिनिटं) नवव्या आणि नवी दिल्ली (सरासरी 23 मिनिटं) सहीत दहाव्या स्थानी आहे.
जागतिक स्तरावर कोलंबियामधील बैरेंक्विला (Barranquilla) हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर असून येथे 10 किमी अंतर कापण्यासाठी 36 मिनिटं 6 सेकंद लागतात. जागतिक स्तरावरील यादीतील अव्वल पाच पैकी तीन शहरं भारतीय असून चौथ्या स्थानी पुणे आहे.
सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरांच्या नकोश्या यादीत पुणे शहराने स्थान मिळवलं आहे. ही नक्कीच पुणेकरांना चिंतेत टाकणारी बाब आहे.
पाचव्या स्थानी लंडन, सहाव्या स्थानी कोयटो, सातव्या स्थानी लिमा, आठव्या स्थानी देवाओ सिटी, नवव्या स्थानी त्रुजीलो आणि दहाव्या स्थानी डबलीन ही शहरं आहेत.
भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेली शहरांची यादी
सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेली जागतिक स्तरावरील शहरांची यादी