PHOTOS

भारतातील पहिलं ‘डार्क स्काय पार्क’ महाराष्ट्रात, 'या' व्याघ्र प्रकल्पाला मिळाली नवी ओळख

पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ होण्याचा मान दिला.

Advertisement
1/8
नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला नवीन ओळख
नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला नवीन ओळख

महाराष्ट्रातील नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांना रात्रीच्या वेळी तारे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

2/8
भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ होण्याचा मान
भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ होण्याचा मान

रात्रीच्या वेळी अवकाशातील तारे पाहण्यासाठी अनेकदा मानवी वस्तीपासून दूर जावं लागतं. याच पार्श्वभूमीवर आकाश निरीक्षणासाठी एखादी राखीव जागा किंवा उद्याने तयार व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ ची स्थापना करण्यात आली. याच संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ होण्याचा मान दिला.

3/8
डार्क स्काय पार्क क्षेत्र म्हणजे काय?
डार्क स्काय पार्क क्षेत्र म्हणजे काय?

डार्क स्काय पार्क हे असे क्षेत्र असते, ज्या ठिकाणी फक्त नैसर्गिक प्रकाश असतो. या ठिकाणी कृत्रिम प्रकाशाचा अभाव असतो. तसेच या ठिकाणची हवा ही प्रदूषणमुक्त असते. ज्यामुळे आकाश सहज न्याहळता येते. 

 

4/8
आशियातला पाचवा प्रकल्प
आशियातला पाचवा प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘डार्क स्काय पार्क’ हा आशियातला पाचवा प्रकल्प असून याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत.

5/8
आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरलं जाणार नाव
आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरलं जाणार नाव

‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ने पेंच व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोरले जाणार आहे.

6/8
आकाश निरीक्षणसाठी खास व्यवस्था
आकाश निरीक्षणसाठी खास व्यवस्था

या व्याघ्र प्रकल्पातल्या पेंच सिलारी बफर झोन पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोलीमध्ये आणखीन एक दुर्बीण बसवली जाणार आहे. याद्वारे आकाश निरीक्षण करण्यासाठी, न्याहाळण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली.

 

7/8
शंभरहून अधिक पथदिव्यांची दिशा बदलली
शंभरहून अधिक पथदिव्यांची दिशा बदलली

तसेच पवनी बफर क्षेत्राच्या आजूबाजूला वाघोली, सिल्लारी, पिपरिया, खापा या गावांमध्ये शंभरहून अधिक पथदिवे आणि सामुदायिक दिवे जमिनीकडे तोंड करुन लावण्यात आलेले आहेत. त्यांची दिशा बदलण्यात आली आहे.

8/8
रात्रीच्या वेळी तारे पाहण्याचा आनंद
रात्रीच्या वेळी तारे पाहण्याचा आनंद

त्यामुळे महाराष्ट्रातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आता नागरिकांना रात्रीच्या वेळी तारे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.





Read More