Pakistani Serials Banned In India: सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण स्थितीत आहेत. पाकिस्तानने भारतातील काही ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय लष्कराने तो यशस्वीरित्या उधळून लावला. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानी कंटेंटवर बंदी लागू केली आहे. या निर्णयामध्ये पाकिस्तानी गाणी, चित्रपट, पॉडकास्ट आणि टीव्ही शो यांचा समावेश आहे. यामध्ये भारतात लोकप्रिय ठरलेल्या अनेक मालिकांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध पाकिस्तानी मालिकांबद्दल ज्यांना भारतात पाहण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे.
हानिया आमिर आणि फराह मुस्तफा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचे प्रत्येक भाग 15 दशलक्षांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. आठवड्यातून दोन वेळा प्रसारित होणारी ही मालिका भारतातही खूप लोकप्रिय होती.
कुब्रा खान, सबा हमीद, अली रहमान खान आणि अली रझा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचे 33 भाग प्रसारित झाले आहेत. या मालिकेच्या 31व्या भागाला तब्बल 1 कोटी व्ह्यूज मिळाले होते.
यमना झैदी आणि हुमायून सईद यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा शो सुरु होताच पहिल्याच 24 तासांत 25 लाख व्ह्यूज मिळाले. प्रत्येक भागाला सरासरी 4.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले.
हारून कडवानी, कोमल मीर आणि समीर सोहेल यांसारखे कलाकार या मालिकेत होते. या शोमधील एकही भाग असा नव्हता ज्याला 4 दशलक्षांपेक्षा कमी व्ह्यूज मिळाले असावेत.
दानिश तैमूर आणि लेबा खुर्रम यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका भारतातही पाहिली जात होती. पहिल्या भागाला 24 दशलक्ष व्ह्यूज मिळाले. तर सरासरी प्रत्येक भागाला 5.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
जोहरा अमीर, आलिया अली आणि फवाद जलाल यांचा सहभाग असलेली ही एक डेली सोप मालिका होती. भारतातील प्रेक्षक ही मालिका OTT आणि YouTube द्वारे पाहत होते.
दानिश तैमूर आणि हीबा बुखारी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांत 21 दशलक्ष व्ह्यूज पार केले. ही मालिका आठवड्यातून दोन वेळा प्रदर्शित होते..
मावरा होकेन, सहर खान, उस्मान मुख्तार आणि मोहिब मिर्झा यांच्या भूमिका असलेल्या या मालिकेचे आतापर्यंत 32 भाग प्रसारित झाले आहेत. प्रत्येक भागाला सरासरी 7.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
हानिया आमिर आणि फरहान सईद यांच्या या मालिकेचे एकूण 40 भाग आहेत. प्रत्येक भागाला 4 दशलक्षांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून, भारतातही या शोचे मोठे प्रेक्षकवर्ग होते.