India vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना थेट टीम इंडियाची कवाडं खुली होतील. त्यामुळे खेळाडूंमध्ये चुरशीची लढाई सुरू झाली आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विकेटकिपर फलंदाजांमध्ये अभिषेक पोरेल, केएस भरत, ऋषभ पंत, ध्रुव जुरैल या खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.
बांगलादेश टेस्टसाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरैल या दोन विकेटकिपर फलंदाजांना स्कॉडमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर यापैकी एकजण प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल.
तर बीसीसीआयसमोर केएल राहुलचा पर्याय देखील खुला असणार आहे. केएल राहुलला संघात स्थान मिळू शकतं. केएलने इंडिया बी संघाविरुद्ध अनुक्रमे 37 आणि 57 धावांची खेळी केली होती.
केएल राहुलने दुलीप ट्रॉफीमध्ये विकेटकिपिंग केली नाही, त्यामुळे केएल राहुलला संधी मिळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय.