भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजचा पाचवा सामना आज ओव्हल मैदानात झाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळवला आहे.
भारत इंग्लंड सीरिजमध्ये भारताने 2-2 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळं या इंग्लंड टेस्ट सीरिज ड्रॉ झाली आहे. मात्र भारताने मोठा पल्ला गाठला आहे.
कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र या मॅचचा हिरो ठरला तो मोहम्मद सिराज
भारताने ओव्हल टेस्टमध्ये 6 रनने विजय मिळवल्याने सीरीज ड्रॉ झाली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी इंग्लंडसमोर 396 धावांवर ऑलआउट झाली होती.
इंग्लंडला 374 धावांचे टार्गेट मिळालं होतं. ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती.
सिराजची धडाकेबाज गोलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळाला. भारताने 6 धावांनी हा डाव खेचून आणला.
मोहम्मद सिराजने जेमी स्मिथला बाद केले. त्यानंतर जिमी ओवरटनलादेखील आउट केले. शेवटटच्या ओव्हरला क्रिस वोक्स दुखापतीनंतरही फलंदाजीसाठी उतरला.
मोहम्मद सिराजने या सिरीजमध्ये 9 विकेट काढल्या तर प्रसिद्ध कृष्णा याने 8 विकेट घेतले होते.