IND vs PAK: मुख्य म्हणजे पावसानं सामन्यात व्यत्यय आणला असला तरीही हिरमोड झालेल्या क्रिकेटप्रेमींना एका निर्णयानं आनंद दिला हे इथं म्हणावं लागेल.
IND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय
11 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील (Asia Cup-2023) सुपर 4 राऊंडचा सामना पार पडणार आहे. रिझर्व्ह डे ला पार पडणाऱ्या या सामन्याआधीच एसीसीनं एक मोठी घोषणा केली.
एशियन क्रिकेट काऊन्सिलनं केलेली ही मोठी घोषणा क्रिकेटप्रेमींना आनंद देऊन गेली. एसीसीनं अधिकृत घोषणा करत म्हटलं, 'जिथं सामना थांबला होता तिथूनच तो पुन्हा सुरु होणार आहे.'
सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या क्रिकेटप्रेमींना उद्देशून सांगताना तुमच्याकडे असणारी तिकीटं सांभाळून ठेवा आणि इतिहासाचे साक्षीदार व्हा, अशा आश्वासक शब्दांत एसीसीनं क्रिकेट रसिकांना उद्देशून एक मेसेज दिला.
थोडक्यात आता सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना नव्यानं तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. त्यामुळं जुन्याच तिकीटावर हा सामना पाहता येणार आहे.
सामन्यात मागे वळून पाहायचं झाल्यास रविवारी पावसानं सामना जिथं थांबवला होता तिथूनच तो पुन्हा सुरु होईल. रविवारी भारतीय संघानं नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 24.1 षटकांमध्ये 2 गडी गमावत 147 धावा केल्या होत्या. रिझर्व्ह डेलासुद्धा हीच धावसंख्या संघ पुढे नेताना दिसेल. ज्यासाठी विराट कोहली आणि के.एल.राहुल मैदानावर येणार आहेत.
तेव्हा आता रिझर्व्ह डे ला पाऊस सामन्यावर कृपा करतो का हे पाहण्यासोबतच कोणता संघ सामन्यात बाजी मारेल हे पाहणं अतिशय मत्त्वाचं ठरणार आहे.