PHOTOS

Ind vs Pak: पाकिस्तानी गोलंदाजांनी बदलला Asia Cup चा इतिहास! 39 वर्षात पहिल्यांदाच...

India Vs Pakistan Asia Cup Pakistani Pacers Create History: भारत आणि पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मैदानात आमने-सामने आल्याने चाहत्यांबरोबरच खेळाडूंमध्येही प्रचंड उत्साह होता. मात्र या उत्साहावर पावसाने पाणी फेरलं. पण असं असलं तरी या अर्धवट झालेल्या सामन्यातही पाकिस्तानी गोलंदाजांनी असा काही भन्नाट विक्रम करुन दाखवला आहे की आतापर्यंत जो कोणालाच करता आला नव्हता. जाणून घेऊयात याचबद्दल...

Advertisement
1/11

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामन्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत या स्पर्धेत कोणीही पाकिस्तानला हलक्यात घेऊ नये असं स्पष्ट केलं आहे. 

2/11

आशिया चषक स्पर्धेतील हा सामना अनिर्णित राहिल्याने भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी 1 गुण वाटून देण्यात आल्याने पहिल्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवल्याने पाकिस्तानी 3 गुणांसहीत 'सुपर-4'मध्ये पोहोचला आहे. आशिया चषकामध्ये 'सुपर-4'मध्ये पोहोचलेला पाकिस्तान हा पहिलाच संघ आहे.

3/11

पावसामुळे रद्द झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा पहिलाच डाव खेळवण्यात आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 266 धावांपर्यंत मजल मारली. मात्र दुसऱ्या डावासाठी खेळाडूंना मैदानात उतरताच आलं नाही. 

4/11

मात्र भारतीय सलामीवीरांची या अनिर्णित राहिलेल्या सामन्यामध्ये चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने 35 धावांच्या मोबदल्यात 4 गड्यांना बाद केलं.

5/11

शाहीन शाह आफ्रिदीच्यासोबतीला हरिस रौफ आणि नसीम शाहनेही भन्नाट गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 

6/11

शाहीन आफ्रिदीने 10 ओव्हरमध्ये 35 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. आफ्रिदीने रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा अशा सर्वच आघाडीच्या दमदार खेळाडूंना तंबूत धाडलं.

7/11

तर दुसरीकडे नसीम शाहने 8.5 ओव्हरमध्ये 36 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. नसीम शाहने शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या तळाच्या फलंदाजांना तंबूत परत पाठवण्याचं काम केलं.

8/11

हारिस रौफने त्याच्या 9 ओव्हर्मध्ये 58 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने शुभमन गील, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बाद केलं. 

9/11

पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी 21 ओव्हर टाकल्या पण त्यांना एखही विकेट मिळाली नाही. शादाब खानने 9 ओव्हरमध्ये 58 तर मोहम्मद नवाजने 8 ओव्हरमध्ये 55 धावा दिल्या. तसेच सलमान आगाने 4 ओव्हरमध्ये 21 धावा दिल्या.

10/11

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या या भन्नाट कामगिरीमुळे आशिया चषकाच्या इतिहासामध्ये 39 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे की एका डावातील 10 विकेट्स वेगवान गोलंदाजांनीच घेतल्या. 

11/11

पाकिस्तानने खरं तर आपलाच विक्रम मोडला आहे. पूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्याच नावे होता जो 2004 साली आशिया चषक स्पर्धेमध्ये बांगलादेशविरोधात 9 विकेट्स घेतल्या होता. त्यावेळेस शब्बीदर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद सामी, शोएब अख्तर आणि अब्दुल रझाक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. 





Read More