PHOTOS

India vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...

India vs Pakistan Asia Cup 2023:  भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...

Advertisement
1/13

भारत पाकिस्तान सामन्याआधी काल भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसून सराव केला.

2/13

श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानात विराटने भारतीय गोलंदाजांच्या वेगवान गोलंदाजीवर सराव करताना उत्तम फटकेबाजी केली.

3/13

सरावानंतर विराट ड्रेसिंग रुमजवळ उभा असताना त्याला काही पाकिस्तानी खेळाडू भेटले. यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांचाही समावेश होता.

4/13

कॅण्डीच्या मैदानामध्ये सरावानंतर विराट कोहलीने पाकिस्तानी संघातील खेळाडूंची भेट घेतली.

5/13

यावेळी विराटने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला मिठीही मारली.

6/13

टी-20 विश्वचषकाच्या सामन्याने विराटने सरळ रेषेत हारिस रौफला षटकार लगावला होता. हा षटकार आजही चर्चेत आहे. 

7/13

विराटला पाहताच हारिस रौफने, "जिथे जातो तिथे कोहली कोहली कोहली..." असं ऐकायला मिळत असल्याचं सांगितलं आणि विराटला मिठी मारली.

8/13

विराटने हारिसबरोबरच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमच्या दरवाजाजवळ शादाब खानलाही भेटला.

9/13

विराटने ड्रेसिंग रुमसमोर शाहीन शाह आफ्रिदीबरोबर हस्तांदेलन केलं. 

10/13

इतर पाकिस्तानी खेळाडूंनाही विराट कोहली भेटला. अगदी त्यांची बॅट वगैरेही विराटने तपासून पाहिली.

11/13

या पाकिस्तानी खेळाडूंबरोबर संवाद साधताना विराट अनेकदा जोरात हसतानाही कॅमेरात कैद झाला.

12/13

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा 140 किलोमीटर वेगाने येणारा चेंडू विराटच्या हाताला लागला. त्यानंतर विराटने सराव थांबवला. जखम गंभीर नसल्याचे समजते.

13/13

विराटचा सराव पाहून त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करावी अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे.





Read More