राहुल द्रविड कोच आणि शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाचे खेळाडू श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत नुकतीच दाखल झाली आहे. श्रीलंकेतून पहिला फोटो समोर आला आहे.
चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाल्यानंतर आता युवासेनेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. युवासेना श्रीलंके विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आहे.
राहुल द्रविड कोच आणि शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाचे खेळाडू श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
श्रीलंके विरुद्ध 3 वन डे आणि 3 टी 20 सामने खेळले जाणार आहेत. 16 ते 25 जुलैदरम्यान हे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया या खेळाडूंचा समावेश आहे.
टीम इंडियाने कोलंबो इथे उतरल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर युझर्सनी या सर्वांना जिंकून येण्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
टीममध्ये हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली आहे. तर शिखरच्या नेतृत्वात टीम इंडिया आपली कामगिरी कशी चांगल्या पद्धतीनं पार पाडते याकडे सर्वांचं लक्ष आहे.
टीम इंडिया श्रीलंकेत दाखल; युवासेना लढण्यासाठी सज्ज झाली आहे.