लक्झरी गाड्या, आलिशान बंगल्यांपासून ते कोट्यवधींच्या प्रायव्हेट जेट्सपर्यंत. कोण- कोणत्या कलाकारांकडे आहेत प्रायव्हेट जेट्स? पाहूयात सविस्तर
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याच्याकडे देखील स्वत: चे प्रायव्हेट जेट आहे. त्याची किंमत सुमारे 84 कोटी रुपये इतकी आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडे Gulfstream G550 हे महागडं प्रायव्हेट जेट आहे. परंतु नुकतीच त्यांची इंडिगो फ्लाइटमधून इकॉनॉमी क्लासने प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. 'जेलर 2'च्या शूटनंतर ते या फ्लाइटने प्रवास करत होते.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे देखील त्याचे प्रायव्हेट जेट आहे. ज्याची किंमत 500 कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. अनेकदा तो इकॉनॉमीमध्ये प्रवास करतो.
अभिनेता ऋतिक रोशन याच्याकडेही प्रायव्हेट जेट आहे. परंतु इस्तांबुल एयरपोर्टवर कनेक्टिंग फ्लाइट मिस केल्याने त्याने आपल्या मुलांसोबत इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला होता.
रामचरण याच्याकडे Trujet नावाचं स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. जे ते कुटुंबासोबतच्या सहलींसाठी वापरतात.
अक्षय कुमारचा प्रायव्हेट जेट सुमारे 260 कोटींचा आहे. परंतु, त्यांचा मुलगा आरव नेहमी इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. कारण त्याला आयुष्यात सगळं सहज मिळणार नाही हे शिकवायचं आहे.
'पुष्पा'फेम अभिनेता अल्लू अर्जुन याने आपल्या लग्नानंतर सहा-सीटर प्रायव्हेट जेट खरेदी केलं. याचा वापर तो खासगी सहलींसाठी करतो.
अभिनेत्री नयनतारा हिच्याकडेही स्वतःचं प्रायव्हेट जेट असून ती व्यावसायिक कामासाठी आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्याचा वापर करते.
प्रियंका चोप्रा तिच्या पती निक जोनससोबत प्रवासासाठी स्वतःचं प्रायव्हेट जेट वापरते. ज्याची किंमत 350 कोटी रुपये असल्याचे म्हटले जातं आहे.
सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे Bombardier Challenger 300 प्रायव्हेट जेट आहे. त्याची किंमत जवळपास 260 कोटी इतकी आहे.