सध्या 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जातं आहे. या सीरिजमधील पहिला सामना 20 जून पासून हेडिंग्ले येथे सुरु असून यात इंग्लंडच्या पहिल्या ...
जसप्रीत बुमराह हा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज आहे. बुमराह प्रसिद्ध क्रिकेटर असल्याने तो त्याच्या क्रिकेट सोबतच वैयक्तिक आयुष्याबाबत सुद्धा तेवढाच चर्चेत असतो. वैयक्तिक आयुष्यात बुमराहचे रिलेशनशिप सुद्धा फॅन्समध्ये चर्चेचा विषय राहिले.
15 मार्च 2021 मध्ये जसप्रीत बुमराहने त्याची गर्लफ्रेंड आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन सोबत विवाह केला. त्या दोघांना अंगद नावाचा मुलगा सुद्धा आहे. मात्र बुमराहचं नाव यापूर्वी दोन दाक्षिणात्य अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.
लग्नापूर्वी बुमराहचं नाव हे अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या सोबत जोडलं गेलं होतं. सोशल मीडियावर चर्चा इथपर्यंत पोहोचली होती की अनुपमा आणि बुमराह हे दोघे लग्न करणार आहेत.
मात्र अनुपमा परमेश्वरनच्या आईने बुमराह सोबत आपल्या मुलीच्या लग्नाच्या चर्चा या अफवाह असल्याचं म्हटलं होतं. अनुपमा परमेश्वरनशी नाव जोडल्यानंतर काही दिवसातच बुमराहने संजनाशी विवाह केला होता.
एका चॅट शोमध्ये राशि खन्नाला जसप्रीत बुमराहबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यात तिने म्हटले होते की मी फक्त एवढं माहितीये की जसप्रीत बुमराह एक क्रिकेटर आहे. बस मी त्याबाबत एवढंच सांगू शकते. मात्र तो एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवाह आहे जे की खूप दुःखद आहे.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांची पहिली भेट 2013 च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती. असे मानले जाते की या भेटीनंतर दोघेही मित्र बनले, परंतु त्यानंतर बराच काळ दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही.
संजना आणि जसप्रीतची लव्हस्टोरी ही थोडी फिल्मी आहे. या दोघांनीही त्यांचं नातं बराच काळ माध्यमांच्या डोळ्यांपासून दूर ठेवले. 2021 मध्ये, जेव्हा जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणास्तव इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरिजमधून परत जावे लागले, तेव्हा संजना आणि जसप्रीत यांच्या नात्याबद्दल माहिती येऊ लागली.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनने एकमेकांना जवळपास 2 वर्ष डेट केलं. त्यानंतर 2021 मध्ये दोघांचा विवाह झाला. 4 सप्टेंबर 2023 मध्ये त्यांना मुलगा झाला ज्याचं नावं अंगद असं ठेवण्यात आलं.