PHOTOS

दिवसाचा पगार 22 लाख रुपये, 23 कोटी TVP.. भारतातील सर्वात श्रीमंत कर्मचारी; ही व्यक्ती आहे कोण? काय काम करते?

22 Lakh Per Day Salary: या व्यक्तीचा वर्षाचा पगाराचा आकडा पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. जाणून घ्या सविस्तर...

Advertisement
1/9

दर दिवशी ही व्यक्ती तब्बल 22 लाख रुपये पगार घेते असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्यक्तीचा टीव्हीपी पाहून थक्क व्हाल. ही व्यक्ती आहे तरी कोण?

2/9

भारतात एक अशी व्यक्ती आहे जिचा दिवसाचा पगार 22 लाख रुपये इतका आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच ही व्यक्ती अंबानी किंवा टाटा किंवा अदानी यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती असणार असं वाटेल. मात्र तसं नाहीये. ही व्यक्ती देशातील सर्वात श्रीमंत कर्मचाऱ्यांपैकी एक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण आणि करते काय ते पाहूया...

 

3/9

ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे, सलील पारेख! माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राशीसंबंधित अनेकांनी हे नाव यापूर्वी ऐकलं असेल मात्र इतरांना हे नावं तसं फार नवं आहे. 

 

4/9

सलील पारेख हे इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत.  त्यांना आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीकडून एकूण वेतन म्हणून 80 कोटी 62 लाख रुपये मिळाले आहेत.

 

5/9

पारेख यांनी  मिळालेली ही 80 कोटी 62 लाख रुपयांची रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 22 टक्के अधिक आहे.

 

6/9

2015 साली कंपनीच्या नव्या धोरणांअंतर्गत पारेख यांना 3 लाख 6 हजार 276 रिस्ट्रीक्टेड स्कॉट युनिट्स (RSUs) दिले होते. त्यानंतर 2019 च्या धोरणानुसार पुन्हा 39 हजार 141 आरएसयूज देण्यात आले.

 

7/9

मूळ वेतन आणि निवृत्ती वेतनासही त्यांचं निश्चित वेतन म्हणजेच फिक्स सॅलरी 7 कोटी 94 लाख रुपये इतकी आहे.

 

8/9

उत्तम कामगिरीसाठीचा बोनस आणि व्हेरिएबल पे अशी आणखी 23 कोटी 18 लाखांची रक्कम पारेख यांच्या वेतनाचा भाग आहे.

 

9/9

सगळी आकडेमोड केली तर पारेख यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये दर दिवसाला 22 लाख रुपये पगार घेतला. 





Read More