भारतातील केवळ प्रियांंका चोप्रा या अभिनेत्रीला शाही विवाहसोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. (फोटो साभार IANS)
मेगन मार्कलसोबत प्रियांंकाने अमेरिकन सिरीजमध्ये काम केले होते. या शाही सोहळ्यात आमंत्रितांंमध्ये तिचा समावेश 'ए लिस्टेड' मध्ये करण्यात आला आहे. (फोटो साभार @VogueRunway)
प्रियांका चोप्रा या शाही लग्न सोहळ्यात नी लेन्थ फॉर्मल ड्रेस आणि हॅट परिधान करून सहभागी झाली होती. हा ड्रेस विविएन वेस्टवुडचा होता. लॅव्हेंडर रंगाच्या खास ड्रेसमध्ये प्रियांका अत्यंत सुंदर दिसत होती. (फोटो साभार PTI)
प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांचे लग्न खास करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. (फोटो साभार @TeamPriyanka)
या शाही लग्न सोहळ्यात स्टेजवर फुलांंची सजावट, खानपानामध्ये खास पक्वान्नांचा समावेश करण्यात आला होता. (फोटो साभार PTI)
या शाही विवाहसोहळ्यामध्ये 300 कोटींंहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मीडिया रीपोर्ट्सनुसार या लग्नावर 27 लाख डॉलर तर सुरक्षाव्यवस्थेवर सुमारे 4 कोटी डॉलर्सचा खर्च करण्यात आला आहे.(फोटो साभार PTI)