PHOTOS

Indian Navy vs Merchant Navy: भारतीय नौदल, मर्चंट नेव्हीमध्ये नेमका फरक काय? कुठे मिळतो जास्त पगार?

Indian Navy vs Merchant Navy: इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही यामध्ये नेमका फरक काय? अजिबात गल्लत करू नका...

Advertisement
1/7
महत्त्वाची बाब
महत्त्वाची बाब

Indian Navy vs Merchant Navy: सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय नौदलामध्ये सरकारी स्वामित्वं असणारी अर्थात सरकारी मालकीची जहाजं समाविष्ट असतात. ही जहाजं देश संरक्षणासाठी भारतीय सागरी सीमांतर्गत भागात तैनात असतात. 

2/7
जहाजं
जहाजं

मर्चंट नेव्हीमध्ये सरकार आणि खासगी अशा दोन्ही संस्थांची जहाजं संरक्षणासाठी तैनात असतात. ही जहाजं जागतिक स्तरावर सामान आणि प्रवासासाठीच्या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. 

3/7
प्रशिक्षण
प्रशिक्षण

भारतीय नौदलातील जहाजं देशाच्या सागरी हद्दीत कामं करतात. क्वचितप्रसंगी विविध मोहिमांसाठी ही जहाजं पाठवण्यात येतात. मर्चंट नेव्हीची जहाजं नियमित स्वरुपात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात. भारतीय नौदलासाठीच्या जवानांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी अशा ठिकाणहून प्रशिक्षण मिळतं. तर, मर्चंट नेव्हीमधील कॅडेट 18 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून नोकरीवर रुजू होतात. 

4/7
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता

फ‍िज‍िक्‍स, केमिस्‍ट्री आणि मॅथ्स अशा विषयांसह बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलेले आणि 18 ते 25 वर्षे वयोगटातील इच्छुकांना मर्चंट नेव्हीमध्ये संधी मिळते. तर, भारतीय नौदलात बारावीसह पदवी शिक्षण आणि विज्ञान विषयातील गुण महत्त्वपूर्ण ठरतात. 

5/7
कामाचे तास
कामाचे तास

मर्चंट नेव्हीमध्ये सहसा आठ ते 9 तास दर दिवशी काम करावं लागतं आणि इथं समुद्रात तुम्ही घालवलेला वेळ, तुम्ही उत्तीर्ण केलेल्या परीक्षा या आधारे पदोन्नती होते. भारतीय नौदलात कामाचे तास पदानुसार वेगवेगळे असतात. प्राथमिक स्वरुपात 8 ते 12 तासांची शिफ्ट नौदलाच्या सेवेचा भाग असून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून इथं पदोन्नतीची संधी असते. 

 

6/7
लाभ
लाभ

मर्चंट नेव्हीमध्ये ILO आणि ITF अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमार्फत नोकरीवर असणाऱ्यांना अनेक लाभ मिळतात. तर, भारतीय नौदलामध्ये जवानांच्या कुटुंबाच्या वास्तव्याच्या व्यवस्थेसह प्रवास भत्ते, मोफत उपचार या आणि अशा सुविधा आणि निवृत्तीवेचनाची तरतूद असते. 

7/7
पगार
पगार

पगाराचं म्हणावं तर, मर्चंट नेव्हीमध्ये 3 लाख ते 20.8 लाख रुपये इतका वार्षिक पगार मिळतो. तर, भारतीय नौदलामध्ये पगाराची मर्यादा भारत सरकारकडून निश्चित केली जाते. इथं रँक आणि सेवेच्या आधारे पगार दिला जातो. भारतीय नौदल देशातील सशस्त्र सैन्यदलाच्या रुपा कार्यरत असतं. तर, मर्चंट नेव्ही समुद्री मार्गानं होणाऱ्या व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. 

 





Read More